
उदघाटन प्रसंगी डॉ सुदर्शन राठोड व जिजाऊ सेवा संघाच्या पदाधिकारी
फलटण टुडे वृत्तसेवा (बारामती दि १२आक्टोबर २०२५):–
महिलांनी बनवलेक्या वस्तू व त्यांना हक्काची बाजारपेठ मिळवून देण्यासाठी व परिसरात मार्केटिंग करण्यासाठी जिजाऊ व्यासपीठ उत्कृष्ट काम करताना महिलांसाठी हक्काचे ठिकाण असल्याचे प्रतिपादन उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड यांनी केले.

बारामती तालुका मराठा सेवा संघ प्रणित जिजाऊ सेवा संघ यांच्या वतीने दिवाळी निमित्त महिलांनी बनविलेल्या विविध वस्तूची विक्री व प्रदर्शन चा उदघाटन प्रसंगी डॉ राठोड मार्गदर्शन करत होते.
या प्रसंगी चंदूकाका सराफ च्या संचालिका नेहा सराफ,मराठा सेवा संघ कार्याध्यक्ष प्रदीप शिंदे, विश्वस्त ऍड विजय तावरे, छाया कदम, विजया कदम,उद्योजक सुधीर शिंदे, अजित तावरे, नितीन जगताप, विद्याधर काटे, दिलीप भापकर, हेमंत जाधव, अर्पित जैन, सचिन सस्ते, रफिक अन्सारी,वृक्षल भोसले व रोहिणी आटोळे, सपना ननावरे, प्रीत बावेजा, श्वेता शिंदे श्वेता पाटील सुप्रिया बोबडे चेतना गांधी, निकिता काटे आदी मान्यवर उपस्तीत होते.

ग्रामीण व शहरी भागातील छोट्या मोठ्या उद्योजक महिलांना एकत्र करून डिजिटल माध्यमातून जागतिक बाजारपेठ उपलब्ध करून देणे व प्रत्येक्षात खरेदी विक्री साठी शॉपिंग फेस्टविल चे आयोजन म्हणजे महिलांना आर्थिक साक्षर करणे हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे डॉ सुदर्शन राठोड यांनी सांगितले.
सदर उपक्रम मुळे महिला आत्मनिर्भर होण्यास मदत होत असल्याचे नेहा सराफ यांनी सांगितले.

सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अध्यक्षा स्वाती ढवाण व मनीषा शिंदे, सुनंदा जगताप, कल्पना माने, सारिका मोरे, मनीषा खेडकर, ऋतुजा नलवडे, गौरी पाटील, वंदना जाधव,सुवर्णा केसकर, विद्या निंबाळकर, पूजा खलाटे,भारती शेळके, संगीता साळुंखे,अमृता सूर्यवंशी आदी परिश्रम घेतले.
सूत्रसंचालन सावळेपाटील यांनी केले

