ज्ञानसागरचे खेळाडू झळकले जिल्हास्तरीय स्पर्धेत – तब्बल 27 खेळाडूंची निवड

ज्ञानसागर गुरुकुल चे यशस्वी विद्यार्थी

फलटण टुडे वृत्तसेवा (बारामती दि १२ ऑक्टोबर २०२५):-
ज्ञानसागर गुरुकुल संस्थेच्या विद्यार्थ्यांनी विविध खेळांच्या जिल्हास्तरीय शासकीय क्रीडा स्पर्धेसाठी तब्बल २७ खेळाडूंची निवड झाली आहे. तायक्वांदो, कराटे, मल्लखांब, स्केटिंग, किक बॉक्सिंग आणि बॉक्सिंग या खेळाचा समावेश होता .


तायक्वांदोत झळकले पाच तारे :सोहेल खान, सार्थक ताकमोगे, सुकृत तुपे, संकुल देवकर, कार्तिकी शिंदे स्केटिंगमध्ये गतीला मिळाली दिशा : श्रेया गोरे, वेदिका बारे, प्रेम यादव, आराध्या झगडे, श्रेया झगडे कराटेत बाजी मारलेले विद्यार्थी शिव गायकवाड, आकांक्षा लोखंडे मलखांबमध्ये चपळतेचे दर्शन घडविणाऱ्या रणरागिणी आकांक्षा वनवे, स्वरांजली शिंगाडे, श्रेया बनसोडे, श्रेया मोरे , समृद्धी माने, मेघना केंगार, शरन्या कुंभार किक बॉक्सिंगमध्ये सर्वोत्कृष्ठ प्रदर्शन करणारे सोहेल खान, सार्थक ताकमोगे, सुकृत तुपे, श्रावणी जाधव, आकांक्षा लोखंडे, स्नेहल दराडे, शिव गायकवाड, प्रतीक गवळी आणि बॉक्सिंगम : शिवराजे कौले, सोहेल खान

Screenshot


ज्ञानसागर च्या विद्यार्थ्यांची कामगिरी पाहता स्पष्ट होते की ग्रामीण भागातील मुलांमध्येही अफाट प्रतिभा आणि कौशल्य दडलेले आहे. योग्य मार्गदर्शन आणि संधी दिल्यास ते राज्य व देशपातळीवरही नक्कीच झळकतील, असा मला ठाम विश्वास असल्याचे संस्थापक अध्यक्ष डॉ सागर आटोळे यांनी सांगितले.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!