
फलटण टुडे वृत्तसेवा (पणदरे, दि १२ आक्टोबर २०२५):-अवयवदानवीर कै आकाश बाळासो वाघमोडे धुमाळवाडी, पणदरे यांचे अकाली निधन झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी व भावकीने डोंगराएवढे दुःख बाजूला सारून आकाश चे अवयव दान करण्याचा धाडसी निर्णय घेतला, दोन डोळे, हृदय, स्वादुपिंड, फुफ्फूस, यकृत, दोन किडनी देऊन आकाश चिरंतन राहणार आहे.खर तर कुटुंबाने घेतलेला हा निर्णय तालुक्यात पहिलाच आहे यामुळे दुःखातून चिरंतन स्मृती ठेवण्यासाठी हा निर्णय सर्वांनाच भावला तसेच रक्षाविसर्जन व अस्थी ज्या शेतात आकाश ने प्रामाणिक पणे कष्ट केले तेथीचे विसर्जन करून वृक्षारोपण केले. यामुळे सामाजिक चळवळीतील योगदान वाघमोडे कुटुंबियांनी केलेला स्तुत्य उपक्रम असाच चालू राहावा

याच कुटुंबातील थोरला मुलगा कै महेश बाळासो वाघमोडे याचे काही काळापूर्वीच अपघाती निधन झालेले होते त्याची पत्नी व दोन मुलांसह संपूर्ण परिवार उघड्यावर पडला आहे तरी आपण सर्वांनी या कुटुंबाला आधार द्यावा. त्यांच्या पश्चात आजी, आई- वडील, पत्नी , चिमुकली मुलगा , मुलगी. भावजय , चिमुकले पुतण्या , पुतणी असा परिवार आहे.
*[ संत सद्गुरू बाळूमामा सामाजिक प्रतिष्ठान अहिल्यानगर (धुमाळवाडी ) तर्फे संस्थापक अध्यक्षा सौ रुपाली रवींद्र कोकरे दरवर्षी कोजागरी पौर्णिमेला अवयवदान वीर कै आकाश वाघमोडे सामाजिक कृतज्ञता पुरस्कार देऊन व्याख्यानमाला आयोजित केली जाणार आहे. तसेच दोन्ही मुलांना जिजाऊ ज्ञानमंदीरचे विनोद जगताप यांनी शिक्षणासाठी दत्तक घेतले. ]*



