नाविन्य असलेल्या कौशल्यपूर्ण उपक्रमास विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले पाहिजे : अरविंद निकम

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अरविंद निकम

फलटण टुडे वृत्तसेवा (फलटण, दि १३ ऑक्टोबर २०२५):- फलटण एज्युकेशन सोसायटी च्या मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटण येथे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा फलटण एज्युकेशन सोसायटी चे सेक्रेटरी मा श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या ६१ पूर्ती अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त मुधोजी हायस्कूल मधील इयत्ता पाचवी ते इयत्ता सातवी पर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी स्वतः बनवलेल्या आकाशकंदील व पणती उपक्रमाचे उद्घाटन सोहळा शुक्रवार दिनांक १० ऑक्टोबर २०२५ रोजी आयोजित करण्यात आले होते .

आकाशकंदील प्रदर्शन दालनाचे उद्घाटन करतात अरविंद निकम ,दिलीप राजगुडा ,सुधीर अहिवळे,वसंत शेडगे,ए वाय ननावरे,आर बी निंबाळकर ,आर एस नाळे, पूजा पाटील व इतर मान्यवर

आकाश कंदील व पणती याचे प्रदर्शन मुधोजी हायस्कूल येथील चित्रकला दालन येथे भरविण्यात आले होते यावेळी या दालनाचे उद्घाटन फलटण एज्युकेशन सोसायटीचे प्रशासन अधिकारी अरविंद निकम यांच्या शुभहस्ते करण्यात आले .

या कार्यक्रमास प्रमुख उपस्थितांमध्ये फलटण एज्युकेशन सोसायटी चे तपासणी अधिकारी दिलीप राजगुडा सहाय्यक तपासणी अधिकारी सुधीर अहिवळे उपस्थित होते यावेळी मान्यवरांचा सत्कार प्रशालेचे प्राचार्य वसंतराव शेडगे , उपप्राचार्य ए वाय ननावरे,पर्यवेक्षक अर बी निंबाळकर , पर्यवेक्षक आर एस नाळे, पर्यवेक्षिका सौ पूजा पाटील जेष्ठ शिक्षिका सौ लतिका अनपट यांच्या शुभहस्ते पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला .

प्रदर्शनाची पाहणी करताना मान्यवर

यावेळी बोलताना अरविंद निकम यांनी प्रशालेचा या आगळ्यावेगळ्या उपक्रमाची सुरुवात कशी झाली हे त्यांनी सांगितले या प्रशालाचे कलाशिक्षक बापूराव सूर्यवंशी माझ्याकडे दिवाळीला आकाश कंदील घेऊन येत मग मी त्यांना या नावीन्यपूर्ण उपक्रमाचे प्रशालेमध्ये प्रदर्शन भरवण्यासाठी उपकृत केले व आज या उपक्रमाचे हे पाचवं वर्ष आहे आकाशकंदील व पणती या बाजारात किती किमतिला उपलब्ध होतात व आपण किती खर्चात हा आकाश कंदील बनवला याचे साधारणतः विद्यार्थ्यांना आर्थिक गणिते कसे असतात हे बालवयातच समजेल व त्याचा त्यांना भावी आयुष्यात फायदा होईल तसेच टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू बनविणे यापासून नवनिर्मिती करून आकाश कंदील बनविण्यास विद्यार्थ्यांना प्रशालीतील शिक्षकांनी प्रोत्साहित करावे तसेच त्यांनी यावेळी बोलताना फलटण एज्युकेशन सोसायटीच्या श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मीडियम स्कूल सी बी एस ई या प्रशाला मध्ये दरवर्षी २६ जानेवारीला जे विशेषत: विद्यार्थ्यांनी बनवलेल्या विविध वस्तूंचे प्रदर्शन भरवले जाते . ते आपल्या प्रशालयातील शिक्षकांनी यावर्षी पहावे त्यामध्ये विद्यार्थ्यांनी टाकाऊ वस्तु पासून कश्या टिकाऊ अशा वस्तू व सुंदर अशा कलाकृती सादर केलेल्या असतात आणि हे प्रदर्शन दरवर्षी तेथे भरविले जाते हे प्रदर्शन 26 जानेवारी या दिवशी सर्व विद्यार्थ्यांसाठी व पालकांसाठी खुले केले जाते याचा तुम्ही यावर्षी लाभ घ्यावा असे यावेळी त्यांनी सांगून श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मीडियम स्कूल व मुधोजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज या प्रशालेच्या उपक्रमाबद्दल विशेष कौतुक केले . या राबवलेल्या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना विविध वस्तू निर्मितीचा अनुभव निर्माण करून देण्याची जबाबदारी सर्व शिक्षकांनी घ्यावी यावेळी कलाशिक्षक श्री बापूराव सूर्यवंशी यांचे त्यांनी विशेष कौतुक केले व त्यांना साथ देणारे आर एस घाडगे, सतीष नाळे यांचेही या ठिकाणी कौतुक केले असे उपक्रम प्रत्येक शाळेत राबराबविले गेले पाहिजेत तसेच नावीन्य असलेल्या कौशल्यपूर्ण उपक्रमास विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले पाहिजे असे यावेळी त्यांनी सांगितले तसेच मला या कार्यक्रमावर बोलावल्याबद्दल त्यांनी प्रशालेच्या आयोजकांचे आभार मानले

यानंतर झालेल्या मनोगतामध्ये तपासणी अधिकारी दिलीप राजगुडा यांनी बोलताना सांगितले हा उपक्रम राबवणे यामागील हेतू श्रीमंत संजीवराजे यांचा वाढदिवस असला तरी आकाश कंदीलाचे निरीक्षण केले असता आपण इथे प्रत्येक आकाशकंदील हा स्वतंत्र आहे म्हणजे कोणताही या ठिकाणी एक सारखा आकाश कंदील दिसत नाही ज्याप्रमाणे आपण सर्वजण एकसारखे नाही तसेच विद्यार्थीही एक दुसऱ्या सारखे नाहीत त्यामुळे त्यांच्या कल्पनाशक्ती मुळे असे उपक्रम प्रशालेत राबविले पाहिजेत आणि भावी पिढी आत्मनिर्भर बनविण्यासाठी हे आवश्यक आहे असे सांगितले .

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेचे प्राचार्य वसंत शेडगे यांनी केले यावेळी बोलताना ते म्हणाले की या उपक्रमाचे नियोजन गेली पंधरा दिवसा पासून सुरू होते विद्यार्थ्यात कौशले विकास व्हावा यासाठी असे विविध उपक्रम प्रशालेत राबविले जात आहेत त्यामधील आकाशकंदील व पणती बनविणे हा यामागचा उद्देश आहे असे त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी प्रशालेतील सर्व शिक्षक वृंद उपस्थित होता या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुजित जमदाडे यांनी केले तर आभार आर बी निंबाळकर यांनी मानले

चौकट:-. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या ६१ पूर्ती अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त या कार्यक्रम सोहळ्यात मुधोजी हायस्कूल मधील इंग्लिश विषयाचे शिक्षक सुजित जमदाडे यांनी श्रीमंत संजीवराजे यांच्यावर नाईन ईज फाईन या स्वरचित कवितेचे प्रकाशन अरविंद निकम यांच्या शुभहस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले.

Screenshot
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!