

फलटण टुडे वृत्तसेवा (फलटण दि १३ ऑक्टोबर २०२५):- फलटण एज्युकेशन सोसायटी, क्रिकेट अकॅडमी ऑफ चॅम्पियन, फलटण तसेच गोविंद मिल्क, फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने गोविंद चषक T/20 Under-20 स्पर्धेचे वेळापत्रक नुकतेच श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर (बाबा) यांनी जाहीर केले. यावेळी मा.जिल्हा परिषद सदस्य श्री.धैर्यशील उर्फ दताबापू अनपट, श्रीराम कारखाना संचालक श्री.महादेवराव माने इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी स्पर्धेचे आयोजक श्री.अशोक गाडगीळ, श्री.दशरथराव नाईक निंबाळकर, श्री.अवि कांबळे, मुधोजी हायस्कूल’चे मा.प्राचार्य श्री.बाबासाहेब गंगावणे (सर) उपस्थित होते. स्पर्धेचा शुभारंभ १८ ऑक्टोबर रोजी होणार असून या स्पर्धेत एकूण ९ संघ साखळी पद्धतीने सामने खेळतील. या T/20 Under -20 क्रिकेट स्पर्धेत पुणे, सातारा, माळशिरस, फलटण येथील नामांकित संघ सहभागी होणार आहेत. स्पर्धेचाअंतिम सामना २८ ऑक्टोबर रोजी होणार असून या लेदर बॉल स्पर्धेचा आनंद जास्तीत जास्त क्रीडाप्रेमींनी घ्यावा. असे आवाहन श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर (बाबा) यांनी केले आहे.

