
कांताबाई शिवाजी भापकर
फलटण टुडे वृत्तसेवा :- शरयू साखर कारखान्याचे संचालक अविनाश भापकर यांच्या मातोश्री कांताबाई शिवाजी भापकर यांचे शुक्रवार दि १७ ऑक्टोबर २०२५ रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
आसू येथिल सांप्रदायिकतेचा वारसा चालवणाऱ्या कांताबाई शिवाजी भापकर होत्या. त्यांनी अत्यंत परिश्रमातून आपली तिन्ही मुले उच्चशिक्षित बनवली त्यामध्ये महेश भापकर डॉ. रवींद्र भापकर अविनाश भापकर हे तिघेही उच्चपदस्थावरती कार्यरत आहेत.
सर्वांना बरोबर घेऊन वेगवेगळे उपक्रम व धार्मिक कार्यक्रमांमध्ये हिरीरीने सहभाग घेणार्या होत्या त्यांच्या निधनाने आसू गावावरती शोककळा पसरलीआहे.
त्यांच्यावर आसू येथील स्मशानभूमीमध्ये आज सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत

