विद्या प्रतिष्ठान कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयला अस्मिता खेलो इंडिया स्पर्धेत 2 सुवर्ण आणि १ रौप्य पदक.

फलटण टुडे वृत्तसेवा ( बारामती दि २५ डिसेंबर २०२५):-
दिं.२१ डिसेंबर २०२५ ,पुणे :- अस्मिता खेलो इंडिया सिटी लीग ,पुणे स्पर्धेत विद्या प्रतिष्ठान कृषीजैवतंत्रज्ञान महाविद्यालयच्या खेळाडूंनी किक बॉक्सिंग या खेळ प्रकारात आणखी एक भक्कम ठसा उमटवत तब्बल 2 सुवर्ण पदके आणि १ रौप्य पदक पटकावून आभिमानास्पद कामगिरी केली आहे.
या स्पर्धेत राज्यातील वीस वर्ष वयोगटातील किक बॉक्सिंग या खेळ प्रकारात अनेक गुणवान खेळाडूंमध्ये कठीण स्पर्धा पाहायला मिळाली. त्यातही विद्या प्रतिष्ठान कृषीजैवतंत्रज्ञानचे खेळाडू सुरुवातीपासूनच वर्चस्व गाजवत आघाडीवर राहिले.
या स्पर्धेत आकांक्षा रुपनावर आणि गौरवी देशमुख यांनी जोरदार लढतीत उल्लेखनीय खेळ करत सुवर्णपदकांची कमाई केली,तसेच पूर्वा जाधव या खेळाडूने रौप्य पदक मिळविले. प्रत्येक खेळाडूने अचूक स्ट्राईक, संयमित बचाव आणि शक्तिशाली तंत्राच्या जोरावर प्रतिस्पर्ध्यावर मात केली.
या ऐतिहासिक कामगिरीवर प्रतिक्रिया देताना विद्या प्रतिष्ठान कृषीजैवतंत्रज्ञानच्या प्राचार्या डॉ.सुमन देवरुमठ म्हणाल्या :
“आमचे खेळाडू आज ज्या आत्मविश्वासाने, शिस्तीने आणि जोमाने रिंगमध्ये उतरले, ते पाहून आम्हाला अपार अभिमान वाटतो. ही पदके केवळ विजयाची खूण नाहीत, तर सातत्यपूर्ण मेहनत, आदर्श प्रशिक्षण आणि पालकांच्या सहकार्याचे यश आहे. आमचे खेळाडू अशी चमकदार कामगिरी करत असल्याने पुढील राष्ट्रीय स्पर्धांमध्येही त्यांचे यश निश्चितच उज्वल असेल, असा मला पूर्ण विश्वास आहे. “
विद्यार्थ्याच्या उज्वल यशाबद्दल विद्या प्रतिष्ठान संस्थेचे अध्यक्ष आदरणीय शरदचंद्र पवार साहेब, उपाध्यक्ष अँड, अशोक प्रभुणे, खजिनदार युगेंद्र पवार, सचिव अँड नीलिमा गुजर, विश्वस्त मा. अजितदादा पवार, मा. विठ्ठलदास मणियार, सौ. सुप्रिया सुळे, सौ सुनेत्रा पवार, मा. प्रतापराव पवार, डॉ राजीव शहा, श्री किरण गुजर श्री मंदार सिकची, रजिस्ट्रार कर्नल श्रीषं कंबोज तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थ्याचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!