
प्रशस्तीपत्र सह यशस्वी विद्यार्थी
फलटण टुडे वृत्तसेवा (बारामती २५ डिसेंबर २०२५):-
कटफळ येथील अब्बास मोहम्मद हुसेन एज्युकेशन ट्रस्ट संचलित झैनबिया मिडियम स्कूल सी.बी.एस.ई कटफळच्या विभागातील इयत्ता पहिली ते दहावीच्या ५२५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. ही स्पर्धा महात्मा गांधी राजभाषा हिंदी प्रचार संस्था समितीने आयोजित केलेल्या हिंदी ऑलिम्पियाड परीक्षेत उत्कृष्ट प्रदर्शन केले.
इयत्ता पहिली ते नववी मधून गार्गी चव्हाण, धैर्यशील दळवी, सारा गावडे, अथर्व जोगदंडकर, काव्या सूर्यवंशी, ईशानी सिंह, समीक्षा भोसले, अलविरा अत्तार, जुवेरीया मुलांनी, आर्या झगडे, श्रावणी चांदगुडे इत्यादी विद्यार्थ्यांचे महात्मा गांधी राजभाषा पुरस्कार तसेच मेडल व प्रशस्तीपत्रक देऊन बक्षीस वितरण करण्यात आले.
तसेच शाळेच्या प्राचार्या.इन्सिया नासिकवाला यांना आदर्श मुख्याध्यापिका पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच परीक्षा मार्गदर्शक परवीन इनामदार यांना आदर्श राजभाषा भूषण पुरस्कारने सन्मानित केले. तसेच सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शकशन करणाऱ्या ममता अहुजा, श्वेता बगाडे, वैशाली काळे, शुभांगी पवार, मेहक बागवान इत्यादी शिक्षकांचे व यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळेच्या प्राचार्या.इन्सिया नासिकवाला यांनी कौतुक केले.


