श्रीमंत मालोजीराजे कृषी प्रदर्शन २०२५ चे शानदार शुभारंभ

भविष्यकाळात शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता सोबत सुधारित वाण व शेती अवजारांचा वापर करावा लागेल – श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर

फलटण टुडे वृत्तसेवा ( फलटण दि २६ डिसेंबर २०२५):- महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी मान्यताप्राप्त फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय व कृषी महाविद्यालय, फलटण आयोजित श्रीमंत मालोजीराजे कृषी प्रदर्शन 2025 उद्घाटन प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी व माजी अध्यक्ष, जिल्हा परिषद, सातारचे मा. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना कै. श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर यांनी शेतीशाळा सुरू केली, शेतकऱ्यांना नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती व्हावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवला होता, काळानुसार बदल होत गेले शेतीमध्ये यांत्रिक शेतीला महत्त्व आले, पाण्याच्या अनिवार्य वापरामुळे शेतीचे उत्पादन घटू लागले याबाबत श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय व कृषी महाविद्यालय तत्सम संस्थांनी मार्गदर्शन केले तरी देखील भविष्यकाळातील कृत्रिम बुद्धिमत्ता बरोबरच सुधारित वाण, बियाणे व शेती अवजारे वापरावी लागतील व त्यानुसार आधुनिक शेती करावी लागेल असे प्रतिपादन उपस्थितांना केले. श्रीमंत मालोजीराजे कृषि प्रदर्शन 2025 उद्घाटन समारंभासाठी अध्यक्ष म्हणून , फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार श्री. दिपकराव चव्हाण लाभले. श्रीमंत मालोजीराजे कृषि प्रदर्शनाचे उद्घाटन कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर यांनी कृषी प्रदर्शनाचे पार्श्वभूमी, कृषी प्रदर्शनासाठी सहभागी झालेल्या कृषी निवेष्ठांच्या कंपन्या व कृषी प्रदर्शनाचे महत्त्व याबद्दल उपस्थितांना प्रतिपादन केले. गोविंद फाउंडेशनच्या संचालिका श्रीमंत सौ. शिवांजलीराजे नाईक निंबाळकर वहिनीसाहेब यांना नेदरलँड सरकारडून फर्म इम्पॅक्ट अवार्ड सन्मानासाठी विशेष सत्कार मिळाल्याबद्दल गोविंद फाउंडेशनचे सौ. प्रतीक्षा खेतमाळीस यांनी सन्मान स्वीकारला. फलटण तालुक्यातील पिक लागवड, फळबाग लागवड, भाजीपाला लागवड, पशु संगोपन विविध क्षेत्रामधील प्रगतशील शेतकऱ्यांचा सन्मान प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. श्रीमंत मालोजीराजे कृषि प्रदर्शन उद्घाटन प्रसंगी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार श्री. दिपकराव चव्हाण यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना कृषि शिक्षण, शेती तंत्रज्ञान अनुभवा आधारित शेती तंत्रज्ञान, ऊस लागवड शेती, फळांचे गाव असलेले धुमाळवाडी, शेतीचे यांत्रिकीकरण तसेच अधिकतम शेतकऱ्यांनी कृषि प्रदर्शनाचा लाभ घ्यावा व प्रतिसाद द्यावा असे अनुमोदन उपस्थितांना केले. श्रीमंत मालोजीराजे कृषी प्रदर्शन 2025 उद्घाटन समारंभ प्रसंगी श्री. दत्तात्रय अनपट, माजी सदस्य, जिल्हा परिषद, सातारा, डॉ. बाळासाहेब शेंडे, चेअरमन, श्रीराम जव्हार सहकारी साखर कारखाना, श्री. वसंतकाका गायकवाड, माजी सभापती, पंचायत समिती, फलटण, श्री. शंकरराव मारकड, माजी सभापती, पंचायत समिती, फलटण, श्री. निलेश कापसे, सदस्य, फलटण कृषी उत्पन्न बाजार समिती, महाविद्यालयीन समितीचे उपाध्यक्ष श्री. शरदराव रणवरे, श्री. हेमंत रानडे, ट्रेझरर, मे. गव्हर्निंग कौन्सिल, श्री. भोजराज नाईक निंबाळकर, मे. गव्हर्निंग कौन्सिल सदस्य, श्री. रणजीत निंबाळकर, मे. गव्हर्निंग कौन्सिल सदस्य, श्री सी. डी. पाटील, मे. गव्हर्निंग कौन्सिल सदस्य, श्री. आर. एच. पवार, मे. गव्हर्निंग कौन्सिल सदस्य, श्री. चंद्रकांत रणवरे, चेअरमन, बोर्ड ऑफ ट्रस्टीज, श्री. अरविंद निकम, प्रशासन अधिकारी, फलटण एज्युकेशन सोसायटी, डॉ. पंढरीनाथ कदम, प्राचार्य, मुधोजी महाविद्यालय, फलटण, श्री. सुधीर अहिवळे, माजी प्राचार्य, मुधोजी हायस्कूल, फलटण, श्री. शिवाजीराव घोरपडे, श्री. संजय भोसले, तसेच फलटण तालुक्यातील सर्व पत्रकार, शेतकरी, महिला, युवक, बचत गटाचे प्रतिनिधी, महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचारी, विद्यार्थी विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते. कृषी प्रदर्शन निमित्त महाविद्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांना शांतीकाका सराफ, सुपरस्टिच, ऑलिंपिक स्पोर्ट्स, कराड आणि नंदकुमार आर्ट्स, फलटण यांच्यातर्फे टी शर्ट व कॅप्स प्रायोजक केल्याबद्दल आयोजकातर्फे सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी सृष्टी झाडोकर, कुमारी दीक्षा चौगुले, कुमारी वेदांतिका गेजगे व आभार कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यु. डी. चव्हाण यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी सृष्टी झाडोकर, कुमारी दीक्षा चौगुले, कुमारी वेदांतिका गेजगे व आभार कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यु. डी. चव्हाण यांनी व्यक्त केले.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!