
फलटण टुडे वृत्तसेवा( फलटण दि २७ डिसेंबर २०२५):- फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय व कृषी महाविद्यालय, फलटणच्या तर्फे आयोजित श्रीमंत मालोजीराजे कृषी प्रदर्शन 2025 भव्य उद्घाटन झाल्यानंतर प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी कृषी प्रदर्शनाच् आकर्षण म्हणून बायर क्रॉप सायन्स मोफत निमिटोड तपासणी, कृषि विभागाचा भाजीपाला, फळबाग, पिकांचे सुधारित वाण, आधुनिक शेती पद्धती तंत्रज्ञान, शेततळे, ऊस संशोधन केंद्र पाडेगाव यांचे उसाची सुधारित वाण व वैशिष्ट्ये, श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय व कृषि महाविद्यालय यांचे महाविद्यालयातील अनुभवाधारीत कृषि शिक्षण द्वारे बनविण्यात आलेल्या विविध कृषि निविष्ठा, के बी क्रॉप सायन्सचे के बी चे शेतीसाठी लागणारे सेंद्रिय खते, जैविक कीटकनाशक, जैविक बुरशीनाशके, रोपवाटिका लागवड मध्ये भाजीपाला, फळबाग रोपे, राधा म्हैस जगातील सर्वात बुटकी म्हैस
परिसरातील शेतकरी, युवक, महिला बचत गट, महिला शेतकरी बहुमोल प्रतिसाद मिळाला. परिसरातील 10000 शेतकऱ्यांनी कृषी प्रदर्शनाला भेट देऊन बहुमोल असा प्रतिसाद दिला. कृषि प्रदर्शनाच्या कालावधीमध्ये फलटण परिसरातील शेतकऱ्यांनी शेती तंत्रज्ञानाचा फायदा घेऊन प्रदर्शनाला उदंड प्रतिसाद द्यावा असे आवाहन आयोजकांनी व्यक्त केले.

