जिल्हा परिषद व पंचायत समिती पूर्ण ताकदीने लढवावी पक्ष तुमच्या पाठीशी ठामपणे उभा आहे, नगर विकास व इतर खात्यामार्फत निधी कमी पडू देणार नाही : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

फलटण नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगरसेवक सत्कार प्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, माजी आमदार दीपक चव्हाण, श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर,श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर,नवनिर्वाचित नगरसेवक,नगरसेविका, माजी नगरसेवक व इतर मान्यवर

फलटण टुडे वृत्तसेवा(मुंबई( ठाणे),दि २७ डिसेंबर २०२५):
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक कार्यक्रम लवकरच जाहीर होणार असून त्या अनुषंगाने फलटण येथील शिवसैनीक व फलटण नगर परिषदेच्या नवनिर्वाचित शिवसेना पक्षाचे नगरसेवक यांनी शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा नामदार एकनाथ शिंदे यांची आज भेट घेतली व नवनिर्वाचित नगरसेवक यांचा यावेळी उपमुखमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

ठाणे येथील निवासस्थानी नामदार एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार झाल्यानंतर शिंदे यांनी मिळालेल्या यशाबद्दल सर्वांचे अभिनंदन केले.जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीला आत्तापासूनच कामाला लागावे पक्ष तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा असून फलटण नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान दिलेली सर्व आश्वासने नगर विकास व इतर खात्यामार्फत सोडवण्याचे व त्यासाठी आवश्यक असलेला निधी कमी पडू देणार नाही असे आश्वासन यावेळी उपस्थितांना त्यांनी दिले.

नवनिर्वाचित नगरसेवकांच्या सत्कारा प्रसंगी माजी आमदार दीपक चव्हाण,जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर,पंचायत समितीचे माजी सभापती विश्वजीतराजे नाईक निंबाळकर,माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक पांडुरंग गुंजवटे, माजी नगरसेवक अनिकेतराजे नाईक निंबाळकर, माजी नगरसेवक किशोरसिंह नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा शिवसेना संघटक विराज खराडे,फलटण तालुकाप्रमुख पिंटू (नाना ) इवरे, युवा उद्योजक यशवंत पाटील,फलटण तालुका संघटक विजय मायने, पिंटू गायकवाड,दत्तात्रेय मोहिते व सर्व नवनिर्वाचित नगरसेवक,नगरसेविका व इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!