जमिनीचे आरोग्य सजग करणे हे युवा शेतकऱ्याची जबाबदारी – कृषिभूषण श्री.अंकुश पडवळे

फलटण टुडे वृत्तसेवा (फलटण,दि २८ डिसेंबर २०२५):- फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित महात्मा फुले कृषी विद्यापीठटी, राहुरी मान्यताप्राप्त श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय व कृषी महाविद्यालय, फलटण आयोजित श्रीमंत मालोजीराजे प्रदर्शन 2025 मधील शेतकरी चर्चासत्र कार्यक्रमांमध्ये प्रमुख वक्ते म्हणून लाभलेले कृषिभूषन श्री. अंकुश पडवळे यांनी मार्गदर्शन करताना जमिनीचे आरोग्य सजग करणे हे युवा शेतकऱ्याची जबाबदारी आहे तसेच भारतातील झालेली हरितक्रांतीचा काळ व बदलता शेतीचा काळ, शेतीमधील आर्थिक ताळेबंद, मार्केटमधली तेजी व मंदी, बाजाराचा अभ्यास करून पिक लागवडीसाठी निवडणे, बाजार भावातील तेजी व मंदी नुसार शेतीचे लागवड तंत्रज्ञान अवघत करणे, शेती व शेती संबंधित शेतीपुरक व्यवसाय व व्यवस्थापन, नियंत्रित शेती व्यवस्थापन, भविष्यातील शेतीतील सेंद्रिय शेतीद्वारे संधी, रासायनिक शेतीचे मानवी आरोग्यावरील परिणाम, काळानुसार जमिनीमधील सेंद्रिय कर्ब कमतरता होणे, बदलत्या काळानुरूप पिक उत्पादकता कमी होणे ही चिंतेची बाब, पुरागम काळापासून महिला शेतीतील अग्रेसर, जमिनीचे आरोग्य सजग करणे हे युवा शेतकऱ्याची जबाबदारी, शेतीमधील रासायनिक खते व औषधे वापरासाठी शेतकऱ्यामधली स्पर्धा सुरू आहे, रासायनिक खते ही मृदा परिक्षणाचे कार्ड पाहून करण्यात यावा, अधिकतम शेणखत वापरणे महत्वपूर्ण, जैविक खते सेंद्रिय कर्ब व्यवस्थापनसाठी मदत करत आहे असे प्रतिपादन उपस्थितांना केले. श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी व युवा शेती उद्योजक श्री. प्रतिक भोसले यांनी मार्गदर्शन करताना बदलत्या शेतीचे पंचसूत्रे, एकात्मिक शेती तंत्रज्ञान, शेती विभाजन, बदलती हवामान व आत्मनिर्भर शेती व्यवस्थापन पद्धती, शेतीतील पंचसूत्रे व व्यवस्थापन ही काळाची गरज, शिक्षण मधून शेती तंत्रज्ञानाची अवघत करणे महत्वाचे, शेती सकारात्मक दृष्टिकोन ठेऊन आधुनिक शेतीकडे वळावे असे प्रतिपादन उपस्थितांना केले. जीएसटी क्रॉप सायन्स लिमिटेडचे वरिष्ठ विपणन कार्यकारी श्री. शशिकांत भापकर यांनी मार्गदर्शन करताना शेतीमध्ये रासायनिक औषधे वापरताना घ्यावयाची काळजी, शेतीतील खते व औषधे वापरताना पाण्याचा pH नियंत्रित करणे महत्वपूर्ण ठरत आहे असे प्रतिपादन उपस्थितांना केले. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना महाविद्यालयीन समितीचे उपाध्यक्ष श्री. शरदराव रणवरे यांनी शेतीचे सेंद्रिय व तांत्रिक व्यवस्थापन, महाविद्यालयातील विविध कृषीपूरक व्यवसाय व्यवस्थापन, हवामान अंदाजाद्वारे शेती, बदलता बाजारभावबद्दल माहिती उपस्थितांना संबोधित केले. सदरील शेतकरी चर्चासत्राला फलटण एज्युकेशन सोसायटीचे प्रशासन अधिकारी श्री. अरविंद निकम, श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर, कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यु. डी. चव्हाण, परिसरातील शेतकरी, प्राध्यापक वृंद, महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.ए. आर. ससाणे व प्रमुख पाहुण्यांचा परिचय डॉ. जी. बी. अडसूळ यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन कुमार शिवम काकडे व कुमार रोहित मनगेनी आणि आभार प्रा. एन. एस. ढाल्पे यांनी व्यक्त केले.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!