फलटण टुडे वृत्तसेवा ( फलटण दि ३० डिसेंबर २०२५):-फलटण एजुकेशन सोसायटी संचलित श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय व कृषि महाविद्यालय, फलटण आयोजित श्रांमत मालोजीराजे कृषि प्रदर्शन २०२५ समारोप प्रसंगी उपस्थितांना उद्देशून बोलताना कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद, सातारचे अध्यक्ष तथा फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी युवा शेतकऱ्यांनी कृषिपुरक व्यवसायांमध्ये सक्रीय होणे गरजेचे आहे तसेच राजश्री छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालय, कोल्हापूरचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. एस. एस. कांबळे हे महाविद्यालयातील कामाजातून वेळ काढून उपस्थित राहिल्याबद्दल आभार व्यक्त केले व कृषि प्रदर्शन आयोजन समितीचे अभिनंदन, कृषि क्षेत्र हा भारतीय अर्थशास्त्राचा कणा, ऊस शेतीसाठी प्रोत्साहन देताना पाडेगावचे कृषि संशोधन केंद्र, भाजीपाला, सेंद्रिय शेती आणि नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देऊन कृषि उत्पन्न वाढविले पाहिजे असे संबोधन उपस्थितांना केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर यांनी कृषि प्रदर्शनाची पार्श्वभूमी, प्रदर्शनाच्या कालावधीमधील सर्व घडामोडी, शेती यांत्रिकीकरण, फलटण परिसरातील प्रदर्शनाला भेट देणारे शेतकरी, फलटण एज्युकेशन सोसायटी, महाविद्यालयातील सर्व कर्मचारी, स्वयंसेवक विद्यार्थी यांचे श्रम व सहकार्य याबद्दल उपस्थितांना प्रतिपादन केले. यानंतर प्रदर्शनात सहभागी झालेल्या सर्व स्टॉलधारकांना सहभागी प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. समारोप प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले राजश्री छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालय, कोल्हापूरचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. एस. एस. कांबळे कृषि प्रदर्शन आयोजन केल्या बद्दल कृषि प्रदर्शन आयोजन समिती व दोन्ही महाविद्यालयाचे अभिनंदन व शुभेच्छा व्यक्त केल्या. समारोप प्रसंगी महाविद्यालयीन समितीचे उपाध्यक्ष श्री. शरदराव रणवरे, मे. गवर्निंग कौन्सिलचे सदस्य श्री. भोजराज नाईक निंबाळकर, श्री. नितीनशेठ गांधी, फलटण तालुका सहकारी दूध संघाचे श्री. धनंजय पवार, मे. गवर्निंग कौन्सिलचे सदस्य श्री. रणजितभाऊ निंबाळकर, प्रशासन अधिकारी श्री. अरविंद निकम, मालोजीराजे शेती विद्यालयाचे प्राचार्य श्री. काळे सर, परिसरातील शेतकरी, प्राध्यापक वृंद, कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन कुमारी दिक्षा चौगुले व कुमारी सृष्टि झाडोकर आणि आभार डॉ. ए. पी. रणवरे यांनी व्यक्त केले.