
बारामती मधील ख्रिस्ती बांधवांचे उपासना मंदिर
फलटण टुडे वृत्तसेवा (बारामती दि ३१ डिसेंबर २०२५):-
बारामती शहरातील ख्रिस्ती उपासना मंदिर या ठिकाणी नाताळनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते या मध्ये भव्य ख्रिसमस ट्री ची उभारणी व चर्चला रोषणाईचे स्वरूप देण्यात आले होते.
१९ डिसेंम्बर ते १ जानेवारी पर्यंत विविध कार्यक्रम संपन्न झाले.
१९ डिसेंम्बर ते २३ डिसेंम्बर रोजी कॅरल सिंगिंग यामध्ये चर्च संबंधातील कुटुंबाच्या घरी जाऊन नाताळ गीते गायली व शुभेच्छा देण्यात आल्या.
२४ डिसेंम्बर रोजी नाताळाच्या पूर्व संधीची उपासना व लेकरांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.
२५ डिसेंम्बर रोजी विशेष उपासना देवाची प्रार्थना देव गौरवाची गीते बायबल वाचन तसेच नाताळाचा विशेष संदेश देण्यात आला
२६ डिसेंम्बर रोजी ख्रिस्ती समुदाय एकत्र येऊन येशू जन्माची भव्य मिरवणूक बारामती शहरातून काढण्यात आली, नाताळ गीते व येशू जन्म कथा चा देखावा सादरीकरण करण्यात आला.
या प्रसंगी पास्टर डॉ. अब्राहम श्रीवास्तव, पास्टर अनोश खपडिया ,पास्टर आशिष पांडला,पास्टर विनय राठोड,पास्टर कसबे,पास्टर कमलेश बनसोडे यांनी विशेष प्रार्थना सादर केली तर ३१ जानेवारी रोजी विशेष उपासना ,नवीन वर्षासाठी परमेशवर कडे प्रार्थना करून १ जानेवरी २०२६ रोजी नवीन वर्षासाठी विशेष प्रार्थना, गुड संदेश आदी विविध कार्यक्रम संपन्न झाले.
पास्टर डॉ. अब्राहम श्रीवास्तव
असिस्टंट पास्टर सचिन वागळे, सुवार्तिक पास्टर दीपक जाधव ,मंडल अध्यक्ष सुशीलकुमार जाधव, उपाध्यक्ष दीपक जाधव ,सचिव राजेश जाधव, खजिनदार सुनील दुबे, संडे स्कूल सुप्रीडेंट मिसेस उज्वला गोवंडे सर्व सभासद उपस्तीत होते.

