
उद्यानदूतांचा स्तुत्य उपक्रम; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
फलटण टुडे वृत्तसेवा (ललगुण प्रतिनिधी, दि ३ डिसेंबर २०२६):-
येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेमध्ये राष्ट्रीय किसान दिनानिमित्त निबंध स्पर्धेचे उत्साहात आयोजन करण्यात आले. फलटण एज्युकेशन सोसायटीच्या श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयातील उद्यानदूतांनी ‘ग्रामीण उद्यानविद्या कार्यानुभव कार्यक्रम’ (RHWE) आणि ‘कृषी औद्योगिक जोड २०२५-२६’ अंतर्गत हा उपक्रम राबविला.

या स्पर्धेसाठी ‘शेतकरी जगाचा पोशिंदा’, ‘मी जर शेतकरी असतो तर’ आणि ‘शेतकऱ्यांसमोर असलेली आव्हाने’ असे विषय देण्यात आले होते. शालेय विद्यार्थ्यांनी या विषयांवर आपले विचार मांडत स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

प्रमुख मान्यवरांची उपस्थितीकार्यक्रमाचे उद्घाटन ललगुण ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. प्रियांका विजय भोसले यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक मा. प्रा. पाचांगणे होते. यावेळी श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यु. डी. चव्हाण, कार्यकारी अधिकारी डॉ. जे. व्ही. लेंभे, डॉ. ए. आर. पाटील आणि कार्यक्रम समन्वयक प्रा. ए. डी. पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

उद्यानदूतांचे नियोजन श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाचे विद्यार्थी (उद्यानदूत) ओमकार जगदाळे, चैतन्य लंगुटे, श्रेयांश जैन, गौरव राऊत, तेजस मदने आणि प्रतिक डोंबाळे यांनी या संपूर्ण स्पर्धेचे नेटके नियोजन केले. शेती आणि शेतकऱ्यांविषयी शालेय विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी, या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या उपक्रमाबद्दल ग्रामस्थ व शिक्षकांनी उद्यानदूतांचे कौतुक केले आहे.

