क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या विचारांना समर्पित स्मारकाचे व महिला प्रशिक्षण केंद्रा’चे भूमिपूजन!

फलटण टुडे वृत्तसेवा ( खंडाळा, नायगाव,दि३ डिसेंबर २०२६):- नायगाव, सातारा येथे ग्रामविकास विभाग, महाराष्ट्र शासन व सातारा जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त ‘क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारक व महिला प्रशिक्षण केंद्रा’चे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी समाजातील अन्याय, अज्ञान आणि स्त्रीदमनाविरुद्ध निर्भयपणे लढा देत स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. प्रचंड विरोध आणि यातना सहन करूनही त्यांनी समाज परिवर्तनाचा मार्ग सोडला नाही. त्यांच्या कार्यामुळेच समतेचा आणि शिक्षणाचा पाया अधिक भक्कम झाला.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, हे स्मारक केवळ वास्तू न राहता महिलांच्या सक्षमीकरणाचे प्रेरणास्थान ठरेल. स्मारकासोबत महिला प्रशिक्षण केंद्र उभारून महिलांना आत्मनिर्भर बनवण्याचा शासनाचा संकल्प आहे. महाराष्ट्र सरकारने मुलींना मोफत उच्च शिक्षण देणारी योजना क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नावाने सुरू केली असून, महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत नागरिकांना ₹5 लाखांपर्यंत मोफत आरोग्य सेवा दिली जात आहे.

नायगाव ग्रामसभेने ठराव केल्यास नायगावचे नाव क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नावाने करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी आश्वस्त केले. स्मारक उभारणीसाठी पुढाकार घेणाऱ्या सर्व विभागांचे त्यांनी अभिनंदन केले.

Screenshot

यावेळी विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, मंत्री जयकुमार गोरे, मंत्री मकरंद जाधव-पाटील, मंत्री शंभूराज देसाई, मंत्री छगन भुजबळ, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, आमदार डॉ. अतुल भोसले, आमदार मनोज घोरपडे व इतर मान्यवर उपस्थित होते.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!