फलटण शहर प्लास्टिकमुक्त करण्यासाठी ‘नेचर अँड वाईल्ड लाईफ वेल्फेअर सोसायटी’ ने कसली कंबर

फलटण टुडे वृत्तसेवा ( फलटण दि२५ जानेवारी २०२६):
आपण भारताचे नागरिक असून आपण समाजाप्रती काही देणे लागतो याची जान ठेऊन आपल्या शहराप्रती असलेली सामाजिक बांधिलकी जपत , फलटण शहर प्लास्टिकमुक्त करण्यासाठी ‘नेचर अँड वाईल्ड लाईफ वेल्फेअर सोसायटी’ ने कंबर कसली आहे.
त्यामुळे नेचर अँड वाईल्ड लाईफ वेल्फेअर सोसायटी’ या संस्थेतर्फे या वर्षातील स्वच्छतेच्या महासंकल्पाचा दुसरा रविवार आज दि. २५ जानेवारी २०२६ रोजी शहरातील फलटण ग्रामीण पोलिस स्टेशन येथील पिरेमिड चौक ते भडकमकर नगर परिसरात यशस्वीरीत्या पार पडला.

Screenshot


या संस्थेच्या स्वयंसेवकांच्यावतीने अवघ्या दोन तासांत ५० किलोहून अधिक प्लास्टिक कचरा गोळा करून स्वच्छतेचा नवा आदर्श मांडला आहे तसेच या उपक्रमाचे कौतुक सर्वत्र केले जात असून या संस्थेच्या वतीने नागरिकांना आव्हान करण्यात येत आहे की आपले शहर स्वच्छ व सुंदर करण्यासाठी आपण सर्वांनी पुढाकार घ्यावा व आपणही सहकार्य करावे व या उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!