
प्रियदर्शनी ज्ञानप्रबोधिनीच्या विधी महाविद्यालयात भारताचा ७७ वा प्रजासत्ताक दिनी संस्थेचे ट्रेझरर तुषार नाईक निंबाळकर (भैय्या)यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी प्रभारी प्राचार्य डॉ. अविष्कार कांबळे व इतर मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते
फलटण टुडे वृत्तसेवा ( फलटण दि २६ जानेवारी २०२६): – प्रियदर्शनी ज्ञानप्रबोधिनीच्या विधी महाविद्यालयात भारताचा ७७ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. संस्थेचे खजिनदार तथा यूवा उद्योजक मा श्री. तुषार नाईक निंबाळकर(भैय्या)यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण संपन्न झाले.
ध्वजारोहण केल्यानंतर श्री. तुषार नाईक निंबाळकर यांनी विद्यार्थ्यांना संविधानाचे महत्त्व विशद केले. लोकशाहीतील नागरिकांचे हक्क आणि कर्तव्यांची जाणीव करून देत त्यांनी विद्यार्थ्यांना भावी आयुष्यासाठी मार्गदर्शन केले.

विधी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. अविष्कार कांबळे यांनीही यावेळी आपले विचार व्यक्त केले. ते म्हणाले:”विधी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी भारतीय संविधानातील हक्क व कर्तव्ये जबाबदारीने पार पाडणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी केवळ कायद्याचे जाणकार न होता, देशाचे आदर्श नागरिक म्हणून स्वतःला सिद्ध करावे.

याप्रसंगी याप्रसंगी महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन: प्रा. मोरे अमित व आभार प्रदर्शन श्री. महामुनी एच. के. यांनी केले.


