बारामती मध्ये रमाई आंबेडकर जयंती साजरी

रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करताना मान्यवर

फलटण टुडे वृत्तसेवा (बारामती दि.८ फेब्रुवारी २०२६):-
बारामती शहरातील तांदुळवाडी येथील धम्मज्योती बुद्ध विहार या ठिकाणी त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पूजापाठ आणि भोजनदानाचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

Screenshot


या प्रसंगी बारामती नगर परिषदेचे नगरसेवक अविनाश निकाळजे, नगरसेविका सौ मनीषा समीर चव्हाण व इतर मान्यवर उपस्तीत होते.
पूजापा ठा चा कार्यक्रम राजेंद्र सरोदे यांनी घेतला तर मनोगत गुरुदेव सरोदे,ॲड. योगेश सरोदे यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती कमिटीच्या वतीने भोजनदानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी गोरख सरोदे, शैलेश सरोदे,भारत सरोदे, दत्तात्रय सरोदे , विश्वास पानसरे,एकनाथ सरोदे, चंद्रकांत सरोदे, बाळू सरोदे, विजय कांबळे,आणि उपासक,उपासिका यांनी विशेष परिश्रम घेतले.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!