अजित बनकर यांनी आईच्या ३० व्या पुण्यतिथीनिमित्त अनोखा उपक्रम राबऊन समाजापुढे ठेवला आदर्श

फलटण टुडे वृत्तसेवा ( डोरलेवाडी,दि १५ फेब्रुवारी २०२६ ):- आपण समाजामध्ये वावरत असताना आपण समाजाला काही देणे लागतो उक्तीप्रमाणे याचे भान आपल्या ला असले पाहिजे याचे भान ठेऊन आपल्या प्रिय व्यक्तीच्या स्मृतिप्रीत्यर्थ डोर्र्लेवाडी गावचे सुपुत्र अजित महादेव बनकर हे प्रत्येक वर्षी आपल्या आईच्या पुण्यतिथीनिमित्त एक अगळा वेगळा उपक्रम राबवत असतात यामध्ये अनाथ , मतिमंद व गरजु लोकांनमध्ये जाऊन त्यांना कपडे व अन्नदान करणे व त्याच्या बरोबर एक दिवस घालवणे असा उपक्रम ते करत.

तसेच यावेळी त्यांच्या मातोश्री कै.सुंदर महादेव बनकर यांच्या तिसाव्या पुण्यतिथीनिमित्त माहेर संस्था मांजरी खुर्द या ठिकाणी अन्नदान, फळे वाटप व त्याच्या बरोबर काही वेळ घालवला

या कार्यक्रम नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्या सौ.कोमलताई संदेश आव्हाळे, नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य अरोग्य दुत युवराज नाना काकडे, मांजरी गावचे सरपंच निखिलशेठ उंद्रे, पुणे जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष अमोलशेठ आव्हाळे , पुणे जिल्हा उपाध्यक्ष श्रीकांत पाटोळे ,अजयजी म्हेत्रे,माणिक आव्हाळे,यां प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा केला.

Screenshot
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!