संविधान गुण गौरव परीक्षेत हरिभाऊ मोरे फलटण तालुक्यात प्रथम

फलटण टुडे वृत्तसेवा ( फलटण दि. २५ फेब्रुवारी २०२६ ) :-
सुजाण नागरीक मंच व संविधान गुण गौरव समिती रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान गुण गौरव परीक्षा २०२५-२६ चे आयोजन मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये परीक्षा केंद्र होते . या केंद्राच्या केंद्रप्रमुख म्हणून सौ. सुजाता बनसोडे यांनी काम पाहिले .

सदर स्पर्धा तीन गटांमध्ये आयोजित करण्यात आली होती यामध्ये प्रथम मोठा गट दुसरा मध्यम गट आणि तिसरा लहान गट या स्पर्धेचा निकाल नुकताच सोमवार दि.२३ फेब्रुवारी २०२६ रोजी यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्युनियर. कॉलेज फलटण येथे जाहीर करण्यात आला .

या जिल्हास्तरीय पारितोषिक वितरण सन्मान सोहळा व संविधान कार्यशाळांमध्ये कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटण चे मानद सचिव मा.श्री.डॉ. सचिन सुभाषराव सुर्यवंशी (बेडके) हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटण चे सदस्य मा.श्री. महेंद्र सुभाषराव सुर्यवंशी (बेडके) हे होते . प्रमुख उपस्थिती मध्ये यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्यु. कॉलेज फलटण च्या प्राचार्या मा. सौ. गायकवाड एन.एम. , उपप्राचार्य मा.श्री. घनवट पी.डी.,पर्यवेक्षक मा. सौ. गायकवाड सी. आर. हे होते . प्रमुख मार्गदर्शक म्हणून संविधान सद्गुण गौरव समितीच्या उपाध्यक्षा सौ सरस्वती ताई गायकवाड होते . विशेष उपस्थिती मध्ये संविधान गुणगौरव समिती चे मा.विलास पवार,संविधान गुण गौरव समिती कार्याध्यक्षा, मा. माधुरीताई सपकाळे / बोराळे तर फलटण तालूका संविधान गुण गौरव समिती च्या समन्वयक सौ. सुजाताताई बनसोडे हे मान्यवर उपस्थित होते .

Screenshot

वरील मान्यवरांच्या शुभहस्ते फलटण तालुक्यातील विजेत्या प्रथम तिन परीक्षार्थींना सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले .

यामध्ये मोठा गट विजेते परीक्षार्थी :-
१. हरिभाऊ मोरे सर (७४ )

  1. ओंकार इंगळे ( 66 )
  2. गौरव साळवी ( 61 )

मध्यम गट विजेते परीक्षार्थी :-
१. अस्मिता बनकर ( ५५ )

  1. अनुजा गायकवाड (53)
  2. साक्षी घोलप (50)

लहान गट विजेते परीक्षार्थी :-
१. अल्फिया इम्रान सय्यद (७२ )

  1. शिवम प्रवीण गायकवाड (61)
  2. आफान आयुब शेख (56)

वरील सर्व विजेत्या परीक्षार्थींचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या मान्यवर व उपस्थितांनी केले .

या कार्यक्रमासाठी सहयोगी म्हणून हनुमान कांबळे, इम्रान सय्यद, रझिया शेख यांनी काम पाहिले .

Screenshot
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!