
उपसरपंच दिपाली नवनाथ चौधर यांचा सत्कार करताना मान्यवर
फलटण टुडे वृत्तसेवा (बारामती दि २६ फेब्रुवारी २०२६):-
बारामती तालुक्यातील वंजारवाडी ग्रामपंचायत च्या उपसरपंच पदी दिपाली नवनाथ चौधर यांची निवड करण्यात आली गुरुवार २५ फेब्रुवारी रोजी झालेल्या ग्रामपंचायत च्या सभेत सर्वानुमते सदर निवड करण्यात आली.
या प्रसंगी सरपंच जगन्नाथ वणवे, सदस्य सागर दराडे, भारत चौधर, गोरख चौधर, बाबासो ठोकळे, सदस्या सौ चिन्मयनंदा नितीन चौधर, सौ संगीता मारुती मालुसरे, सौ राणी शरद चौधर, सौ शशिकला पोपट जगताप व ग्रामसेवक निलेश लव्हटे आणि सोमनाथ गायकवाड, संतोष चौधर, पोपट चौधर व ग्रामस्थ, मान्यवर उपस्तीत होते.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामसेवक निलेश लव्हटे यांनी काम पाहिले.
शासनाच्या विविध योजना तळागाळात पोहोचवण्यासाठी प्रयत्न करू व ग्रामपंचायत विकास कामात अग्रेसर ठेवू असे निवडीनंतर उपसरपंच दिपाली चौधर यांनी सांगितले.आभार नवनाथ चौधर यांनी मानले
—————///-


