अवैध धंद्यावर फलटण पोलीसाची धडाकेबाज कामगिरी

जाधववाडी ता. फलटण येथील लॉजवर छापा टाकून वेश्या व्यवसाय करणा-या इसमावर फलटण पोलीसांची कारवाई

फलटण टुडे वृत्तसेवा ( फलटण दि २६ फेब्रुवारी २०२६):- दि.२५ फेब्रुवारी २०२६ रोजी मा.श्री विशाल कृष्णा खांबे, उपविभागीय पोलीस अधिकारी, फलटण उपविभाग फलटण यांना गोपणीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, मौजे जाधववाडी, ता. फलटण गावच्या हद्दीत ऑरेंज लॉज येथे प्रविण रामचंद्र दडस रा. टाकेवाडी, ता.माण, जि. सातारा हा इसम वेश्या व्यवसाय चालवत आहे. अशी खात्राशीर बातमी मिळाल्यांनतर सदर ठिकाणी जाऊन छापा टाकून पुढील कारवाई करणेबाबत पोलीस निरीक्षक श्री अरविंद काळे फलटण शहर पोलीस ठाणे यांना कळविण्यात आले. मिळाले बातमीप्रमाणे जाधववाडी फलटण येथील ऑरेंज लॉजवर डमी गि- हाईक पाठवून छापा टाकला असता सदर ठिकाणी इसम नामे प्रवीण रामचंद्र दडस रा. टाकेवाडी ता. माण जि. सातारा हा एका महिलेचा स्वतःच्या आर्थिक फायदयाकरिता वेश्या व्यवसाय करीत असल्याचे निष्पन्न झाल्याने प्रवीण रामचंद्र दडस वय-२६ वर्षे रा. टाकेवाडी ता. माण जि.सातारा यांचेवर फलटण शहर पोलीस ठाणेस गु.र.नं.६४/२०२६, भा. न्या. संहि. कलम १४३ (२), १४४(२), सह स्त्रिया व मुली अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधि. १९५६ चे कलम ४ व ५ प्रमाणे गुन्हा दाखल करणेत आला असून त्यास सदर गुन्हयात दि.२५/०२/२०२६ रोजी अटक करणेत आली आहे. सदर आरोपीस दि.२६/०२/२०२६ रोजी मा. न्यायालयात हजर केले असता मा. न्यायालयाने त्याची दि.०२/०३/२०२६ रोजी पर्यंत पोलीस कस्टडी मंजूर करणेत आली आहे. सदर गुन्हयाचा तपास श्री अरविंद काळे, पोलीस निरीक्षक फलटण शहर पोलीस ठाणे हे करीत आहेत.

सदरची कारवाई मा. श्री. तुषार दोशी, पोलीस अधीक्षक सो, सातारा. मा. श्रीमती डॉ. वैशाली कडुकर मॅडम, अपर पोलीस अधीक्षक सो, सातारा. मा. श्री. विशाल कृष्णा खांबे, उपविभागीय पोलीस अधिकारी सो, फलटण उपविभाग फलटण यांचे मार्गदर्शनाखाली फलटण शहर पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक श्री. अरविंद काळे, महिला पोलीस उपनिरीक्षक श्रीमती विजयमाला गाजरे, पोलीस अंमलदार सचिन भोसले, नितीन सजगणे, बापूराव धायगुडे, दत्तात्रय नाळे, दत्तात्रय लवटे, गणेश अवघडे, निखील गायकवाड यांनी पूर्ण केली आहे.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!