फलटण नगरपरिषदेच्या स्थायी समिती आणि विविध विषय समित्यांचे सभापतीच्या निवडी जाहीर!

फलटण टुडे वृत्तसेवा( फलटण दि२६ फेब्रुवारी २०२६):- फलटण नगरपरिषदेच्या स्थायी समिती आणि विविध विषय समित्यांचे सभापती निवड करण्यासाठी आज गुरुवार दि २६ फेब्रुवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेली विशेष सर्वसाधारण सभा राजकीयदृष्ट्या अत्यंत लक्षवेधी ठरली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि अपक्ष नगरसेवकांनी भारतीय जनता पार्टीस बिनशर्त पाठिंबा दिल्याने, पालिकेच्या सर्व विषय समित्यांचे सभापती व उपसभापती पदांच्या निवडी ‘बिनविरोध’ पार पडल्या आहेत.

ही विशेष सभा पीठासीन अधिकारी तथा मुख्याधिकारी निखील जाधव यांच्या अध्यक्षतेखाली प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.

  • फलटण नगरपरिषदेचे नवे ‘सभापती’ पुढील प्रमाणे :*

नगरपरिषदेचा कारभार हाकण्या साठी महत्त्वाच्या विषय समित्यांवर भाजप व राष्ट्रवादीने अनेक अनुभवी आणि नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. सर्व समित्यांच्या सभापतींची यादी खालीलप्रमाणे:

  • सार्वजनिक बांधकाम समिती सभापती : ज्येष्ठ नगरसेवक तथा माजी नगराध्यक्ष सोमाशेठ जाधव.
  • शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक कार्य समिती सभापती : उपनगराध्यक्षा सौ. प्रियदर्शिनी रणजितसिंह भोसले (पदसिद्ध सभापती).
  • स्वच्छता, वैद्यक व सार्वजनिक आरोग्य समिती सभापती : सचिन अहिवळे.
  • पाणीपुरवठा आणि जलनिस्सारण समिती सभापती : राहुल निंबाळकर.
  • नियोजन व विकास समिती सभापती : संदिप चोरमले.
  • महिला व बालकल्याण समिती : सभापती – सौ. मोहिनी मंगेश हेंद्रे, उपसभापती – सौ. कांचन दत्तराज व्हटकर.
  • मागासवर्गीय दुर्बल घटक कल्याणकारी समिती सभापती : सौ. सुपर्णा सनी अहिवळे.

स्थायी समितीचे कोण कोण आहेत सदस्य :-•

नगरपालिकेची ‘स्थायी समिती’ ही अत्यंत महत्त्वाची मानली जाते. या समितीचे पदसिद्ध अध्यक्ष म्हणून नगराध्यक्ष कामकाज पाहणार आहेत, तर सर्व विषय समित्यांचे नवनिर्वाचित सभापती हे या समितीचे पदसिद्ध ‘सदस्य’ असणार आहेत.

याशिवाय, सभागृहातून भाजपचे गटनेते रोहित नागटिळे, स्वीकृत नगरसेवक अशोक जाधव आणि राजे गटाचे गटनेते पांडुरंग गुंजवटे (आबा) यांची स्थायी समितीचे सदस्य म्हणून वर्णी लागली आहे.

Screenshot
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!