कर्कश आवाज करून व विनाकारण वेगात मोटार सायकल चालविण्या-या वाहन धारकावरती फलटण शहर पोलीसांची कारवाई.

फलटण टुडे वृत्तसेवा ( फलटण दि २६ फेब्रुवारी २०२६):-
दिनांक २५ फेब्रुवारी २०२६ रोजी फलटण शहर पोलीस ठाणेकडुन फलटण शहरात मोठया व कर्कश आवाजात फिरणा-या मोटार सायकली व विनाकारण वेगात चालविण्या-या मोटार सायकल बाबत विशेष मोहिम राबविण्यात आली. सदर मोहिमे अंतर्गत फलटण शहर पोलीस ठाणेकडुन एकुण ६ बुलेट व १ यामाहा अशा मोटार सायकल ताब्यात घेवुन त्या मोटार सायकल बुलेट या मॉडीफाय केलेले सायलेन्सर बसविण्यात आलेले होते. व १ यामाहा गाडी मॉडीफाय करण्यात आलेली होती. सदर गाडयावर प्रभावी कारवाई व्हावी या करिता मा. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, फलटण (RTO) यांना त्या मोटार सायकलवर कारवाई करण्याकरिता अहवाल पाठविण्यात आला. त्या अहवालाच्या अनुशंगाने मा. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, फलटण (RTO) यांनी सदर मोटार सायकलची तपासणी करुन घेवुन मोटार सायकल चालक व मालक यांना एकुण ५५,५००/- रुपये दंड आकरण्यात करण्यात आलेला आहे. तसेच बुलेट मोटार सायकलचे सायलेन्सर काढुन घेण्यात आलेले आहेत. तसेच फलटण शहर पोलीस ठाण्याकडुन सदर मोटार सायकल यांचेवर मोटार वाहन कायदयाअन्वये प्रलंबित असलेला ५,०००/- दंड देखील वसुल करण्यात आला आहे. असा एकुण ६०,५००/- रुपये दंड वसुल करण्यात आलेला आहे.

अशा प्रकाराची फलटण शहर पोलीस ठाणे हद्दीमध्ये मोठया व कर्कश आवाजात फिरणा-या मोटार सायकली व विनाकारण वेगात चालविण्या-या मोटार सायकल स्वार तसेच गाडी मालकांवर सातत्याने कारवाई सुरु राहणार आहे. सदरची कारवाई मा.श्री. तुषार दोशी, पोलीस अधीक्षक सो, सातारा, मा.डॉ. वैशाली कडुकर मॅडम, अप्पर पोलीस अधीक्षक सो, सातारा, मा.श्री. विशाल खांबे सर, उपविभागीय पोलीस अधिकारी, फलटण विभाग फलटण, यांचे मार्गदर्शना खाली पोलीस निरीक्षक श्री. अरविंदकाळे, सफौ.एस.एस. शिंदे, पो.कॉ.पी.बी.धायगुडे, पो.कॉ. आर. डी. खरात, पो. कॉ. एस. बी. जगताप,पो.कॉ.एस.एस. परिहार यांनी केलेली आहे.

Screenshot
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!