रुई मध्ये नगरपरिषद च्या माध्यमातून अतिक्रमण वर कारवाई

आरोप प्रत्यारोप चालू पण व्यवसायिक नुकसान प्रचंड

रुई मध्ये बारामती नगरपरिषद अतिक्रमण पथकाने केलेली कारवाई

फलटण टुडे वृत्तसेवा (बारामती दि २८ फेब्रुवारी २०२६):-
बारामती नगरपरिषद च्या अतिक्रमण विभागाने रुई मधील ओढ्या शेजारील मोकळ्या जागेत उभारलेल्या दुकानावर कारवाई करीत (शनिवार दि.२८ फेब्रुवारी ) बांधकामे जेसीबी च्या साह्याने पाडली.
त्यामुळे स्थानिक दुकानदार व नागरिकांनी नगरपरिषद च्या कारवाईचा निषेध व्यक्त करून संताप व्यक्त केला
अजित दादा यांचे दुःखद निधन होऊन एक महिना होत आहे तो पर्यंत गोर गरिबां वर कारवाई केली जात आहे हे निदनिय आहे बांधकामे पाडण्या पूर्वी सूचना देणे गरजेचे असल्याचे दुकानदार व स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे
सायकल दुकानदार व चिकन व्यवसाईक यांचे लाखो चे नुकसान झाले आहे. जर सूचना दिली असती तर नुकसान करूवून न घेता दुकानातील माल इतरत्र नेला असता
असे दुकानदार व नागरिकांचे म्हणणे आहे.

मुळातच सदर बांधकामे नगरपरिषद च्या हद्दीत होती, कोणतेही पूर्व कल्पना न देता बांधली होती, पावसाळ्यात ओढ्याचे पाणी वाढले असते तर धोका होता, नवीन रस्ता त्या ठिकाण हुन मंजूर आहे ,बांधकामे बेकायदेशीर असली तर पूर्व कल्पना दिली असल्याची माहिती बारामती नगरपरिषद अतिक्रमण विभाग यांनी दिली आहे

नगरपालिका प्रशासन पूर्वकल्पना दिली असे प्रशासन चे म्हणणे आहे तर स्थानिक नागरिकांचे व दुकानदार यांचे म्हणणे सूचना दिली नव्हती असे आहे.
लाखोंचे नुकसान नगरपरिषद प्रशासन ने भरपाई द्यावी अन्यथा कोर्टाची पायरी चढू असेही दुकानदार व स्थानिकांनी सांगितले

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!