
फलटण टुडे वृत्तसेवा (फलटण ,दि ०२ मार्च २०२६):-
शिक्षण ही सतत सुरू असणारी प्रक्रिया आहे. बालकांच्या मध्ये संकल्पना स्पष्ट होणे गरजेचे असते ते करण्यासाठी विविध साहित्याचा कृतिशील वापर करून गणित , भाषा , सामान्य ज्ञान या संकल्पना अधिक चांगल्या प्रकारे आपण रुजवू शकतो मुधोजी बालक मंदिर येथील शैक्षणिक साहित्याचे प्रदर्शनात मांडलेल्या सर्व वस्तू उत्तम शैक्षणिक साहित्य आहे असे मत मुधोजी बालक मंदिर येथे आयोजित भव्य बालवाडी साहित्य प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी प्रशालेच्या चेअरमन वसुंधरा राजीव नाईक निंबाळकर यांनी आपले विचार व्यक्त केले

याप्रसंगी भारतीय पत्रकार संघ साताराचे पदाधिकारी विकास शिंदे , राजकुमार काकडे , हिंदुराव गायकवाड , गणेश भोईटे , जुबेर कोतवाल , आप्पासाहेब तांबे ,मुख्याध्यापक रुपेश शिंदे मुधोजी बालक मंदिर च्या मुख्याध्यापिका सुजाता रजपूत यांची प्रमुख उपस्थिती होती

प्रा विकास शिंदे यांनी भारतीय पत्रकार संघाच्या वतीने अभिप्राय व्यक्त करताना बालवाडीमध्ये शिकवल्या जाणाऱ्या प्रत्येक विषयानुसार प्रदर्शनातील साहित्याची आकर्षक मांडणी केल्यामुळे प्रत्येक विषयाचे ज्ञान बालकांना कृतिद्वारे, प्रात्यक्षिकद्वारे अनुभव घ्यायला देऊन शिक्षण दिले जाते हे दिसून येते शाळेच्या मुख्याध्यापिका आणि शाळेतील शिक्षक यांचे आभार मानले हे प्रदर्शन फलटण मधील सर्व शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांनी नक्की पाहण्यासाठी यावे असेही आवाहन त्यांनी यावेळी केले
या प्रदर्शनासाठी शाळेतील शिक्षकवृंदानी विशेष मेहनत घेतली प्रदर्शनाला शिक्षक , पालक ,विध्यार्थी व नागरिकांचा उत्फुर्त प्रतिसाद मिळाला



