“प्राईड ऑफ सीएसीपीई” २०२५ – २६ पुरस्कार प्रा. तायाप्पा शेंडगे यांना जाहीर

प्रा. तायाप्पा मारुती शेंडगे

फलटण टुडे वृत्तसेवा ( पुणे ,दि .२६ मार्च २०२६ ) :-महाराष्ट्रीय मंडळाचे चंद्रशेखर आगाशे शारीरिक शिक्षण महाविद्यालय, गुलटेकडी, पुणे यांच्या वतीने सामाजिक क्षेत्रात, क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या माजी विद्यार्थ्यांना मानाचा “प्राईड ऑफ सीएसीपीई” पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे .
यावेळी वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व “प्राईड ऑफ सीएसीपीई” पुरस्कार प्रदान सोहळा दि.२८ मार्च, २०२६ सकाळी १०:०० वा. चंद्रशेखर आगाशे शारीरिक शिक्षण महाविद्यालयाचे सभागृहात संपन्न होणार असून शैक्षणिक वर्ष सन . २०२५ – २६ चे पुरस्कारार्थी श्री. तायाप्पा मारुती शेंडगे यांना प्रदान करण्यात येणार आहे.

Screenshot

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्ञान प्रबोधिनी माध्यमिक विद्यालय, टिळक पथ, पुणे चे प्राचार्य डॉ. मिलिंद नाईक , महाराष्ट्रीय मंडळ, टिळक पथ, पुणे चे सचिव तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. रोहन दामले , चंद्रशेखर आगाशे शारीरिक शिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सोपान कांगणे यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.

“प्राइड सी ए सी पी ई” (२०२५/२६) पुरस्कारासाठी फलटण एज्युकेशन सोसायटी च्या मुधोजी महाविद्यालया चे क्रीडा शिक्षक तथा राजुरी ता. फलटण येथील मा. श्री. तायाप्पा मारुती शेंडगे यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असून

त्यांच्या या निवडीबद्दल विधान परिषदेचे माजी सभापती तथा विधान परिषदेचे विद्यमान आमदार मा श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर , माजी आमदार दीपकराव चव्हाण,फलटण कृषी उत्पन्न बाजार समिती चे सभापती मा. श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, महाराष्ट्र खो-खो आसोसेशन चे माजी अध्यक्ष मा. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर,फलटण नगरपरिषदेचे विद्यमान नगरसेवक मा श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर , फलटण पंचायत समिती चे माजी सभापती मा. श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर , प्रशासन अधिकारी श्री. अरविंद निकम , तपासणी अधिकारी श्री. दिलीप राजगुडा , श्री. सुधीर अहिवळे,फलटण एज्युकेशन सोसायटीचे नियामक मंडळाचे सर्व सदस्य व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी प्राध्यापक यांनी त्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Screenshot
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!