बारामती तालुका ग्रामपंचायत कर्मचारी संघटना अध्यक्ष पदी पिंटू सावंत

पिंटू सावंत

फलटण टुडे वृत्तसेवा (बारामती दि २७ मार्च २०२६(:-
बारामती तालुका ग्रामपंचायत कर्मचारी संघटना एन. जी. पी ४५११ ची नवीन कार्यकरणी निवड मीटिंग आज शुक्रवार दि. २० मार्च रोजी बारामती पंचायत समिती येथे पुणे जिल्हा सचिव दयानंद भिंगारदिवे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.यावेळी सर्वानुमते बारामती तालुका ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षपदी पिंटू दादाराम सावंत (वंजारवाडी ग्रामपंचायत )यांची एकमताने निवड करण्यात आली.
तसेच उपाध्यक्षपदी अभिजित काशिनाथ गवळी (उंडवडी सुपे), उपाध्यक्ष मयूर गोपीचंद शेडगे(कुरणेवाडी),कार्याध्यक्षपदी चि. विशाल महादेव जराड,(जराडवाडी )सरचिटणीस पदी अनिल दादा माने ,(झारगडवाडी ) सह-सरचिटणीस पदी सिद्धेश्वर सुधाकर नगरे ,(सुपा) प्रसिद्धी प्रमुख पदी सोमनाथ पोपट भिले ,( डोरलेवाडी) ज्येष्ठ सल्लागार पदी अशोक दादा कोकरे (पणदरे), शरद शंकर जाधव( बऱ्हाणपूर ) गणेश शिवाजीराव मोरे (मेडद)संघटक पदी प्रशांत मुकुंद भैकी( मुर्टी), रविंद्र भिसे( काटेवाडी) दादा पारसे ( को-हाळे खुर्द) अनिल यशवंत भोसले(खराडेवाडी), रमेश सूळ(मुढाळे पै.अक्षय जगताप ( जळगाव क.प), महिला प्रतिनिधी सौ वृषाली शांताराम यादव
वरील सर्व पदाधिकाऱ्यांची निवड सर्वानुमते करण्यात आली.
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या समस्या शासन दरबारी मांडून सोडविण्याचा प्रयत्न करू असे निवडी नंतर पिंटू सावंत यांनी सांगितले.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!