फलटण शहर पोलीसांनी मोटारसायकल चोरी करणारे आरोपी केले जेरबंद.

फलटण टुडे वृत्तसेवा ( फलटण दि २८ मार्च २०२६):- फलटण एस.स्टी. स्टॅण्ड येथील स्टॅण्ड च्या मुख्य प्रवेशव्दाराजवळ पार्क केलेली ६०,०००/- किमतीची एक लाल काळे रंगाची होन्डा कंपनीची शाईन मोटारसायकल क्रमांक MH.11.BT.9490 ही दिनांक १५/०२/२०२६ रोजी सकाळी ११.०० ते दुपारी ०२.०० वा. चे दरम्यान चोरीस गेलेची तक्रार तक्रारदार कृपाल श्रीपाल टाळकुटे रा. रविवारपेठ, फलटण ता. फलटण जि. सातारा यांनी दिले तक्रारीवरुन अज्ञात आरोपीविरुध्द फलटण शहर पोलीस स्टेशनला गुन्हा रजि.क्र. १०९/२०२६ बीएनएस कलम ३०३ (२) प्रमाणे मोटार सायकल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दाखल गुन्हयातील चोरीस गेलेल्या मोटार सायकलचाव आरोपीचा शोध घेण्यासाठी मा. पोलीस अधीक्षक सो सातारा श्री. तुषार दोशी साो, मा. अप्पर पोलीस अधीक्षक साो. डॉ. वैशाली कडुकर मॅडम, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. विशाल खांबे सो. यांनी सुचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे गुन्हयाचे तपासात वरीष्ठांनी दिलेल्या सुचनांप्रमाणे फलटण शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी. पोलीस निरीक्षक श्री. अरविंद काळे व गुन्हे प्रकटीकरण शाखेने सदर घटनास्थळी भेट दिली. तपासारम्यान पोलीस निरिक्षक श्री. अरविंद काळे यांना गोपनीय खब-यामार्फत माहिती मिळाल्याने त्यांनी मिळाल्या माहीतीप्रमाणे तात्काळ गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस हवालदार संतोष नाळे ब.नं. १२०० व मुकेश घोरपडे ब.नं. १४९६ अतुल बडे ब.नं. ८८६ यांना आरोपीच्या शोधाबाबत सुचना दिल्या. त्याप्रमाणे पथकाने शोध घेऊन आरोपी ताब्यात घेतले. दोन्ही आरोपींना अटक करुन त्यांचेकडे कौशल्यपुर्ण तपास केला असता दोन्ही आरोपींनी एसटी स्टॅण्ड फलटण येथुन शाईन मोटार सायकल तसेच अकलुज ता. माळशिरस येथुन स्प्लेंडर मोटार सायकल चोरी केलेची कबुली दिली. आरोपींकडुन दोन्ही मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत. दोन्ही आरोपीना पोलीसांनी मा. न्यायालयात हजर केले असता मा. न्यायालयाने गुन्हयाचे अधिक तपासकामी आरोपीना पोलीस कोठडी सुनवली आहे. सदर गुन्हयाचा तपास पो. हवा. संतोष नाळे हे करीत आहेत.

सदरची कारवाई मा. श्री. तुषार दोशी, पोलीस अधीक्षक साो सातारा, मा. डॉ. वैशाली कडुकर मॅडम, अप्पर पोलीस अधीक्षक साो. सातारा, श्री. विशाल खांबे सोो, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण विभाग यांचे मार्गदर्शनाखाली फलटण शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी. पोलीस निरीक्षक श्री. अरविंद काळे, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोहवा. संतोष नाळे, मुकेश घोरपडे, अतुल बडे यांनी पुर्ण केली आहे.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!