
गोजुबावी मधील पिर साहेब दर्गा
फलटण टुडे वृत्तसेवा (बारामती,दि ०१ एप्रिल २०२६):-
ज्या गावात तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघात झाला ते गाव म्हणजे गोजुबावी होय.
अद्यापही दुःखातून सावरले नाही गावात सदर घटना घडण्यास नको होती अशी भावना व्यक्त करताना अश्रू अनावर होत आहेत
त्यामुळे गावकऱ्यांनी शुक्रवार ०३ एप्रिल २०२६ रोजी होणाऱ्या यात्रे मधील सर्व कार्यक्रम रद्द करून फक्त पूजन साधे पणाने होण्याचे जाहीर केले.
गावचे आराध्य दैवत पिरसाहेब उरूस यात्रा उत्सवाबाबत ‘पाडवा वाचन’ प्रसंगी यात्रा कमिटीने मीटिंग प्रसंगी श्रद्धांजली वाहून साध्या पद्धतीने पूजन करण्याचे आयोजन केले व सर्व मनोरंजन व इतर कार्यक्रम रद्द केलेले आहेत

