
डावीकडून कु वेदिका वाघमोरे कु मृण्मयी घोरपडे कु गौरी हिरनावळे
फलटण टुडे वृत्तसेवा (फलटण,दि ०१ एप्रिल २०२६):- हॉकी इंडिया अंतर्गत हॉकी महाराष्ट्र पुणे यांच्यावतीने ध्यानचंद हॉकी स्टेडियम पिंपरी चिंचवड पुणे येथे निवड चाचणीचे आयोजित करण्यात आले होते.
या स्पर्धेपूर्व निवडचाचणी साठी दि हॉकी सातारा संघटनेच्या नऊ महिला खेळाडू कु समृद्धी बनकर, कु श्रद्धा यादव, कु सिद्धी केंजळे, कु आरोही पाटील, कु मानसी पवार, कु गायत्री खरात, कु मृण्मयी घोरपडे कु वेदिका वाघमोरे कु गौरी हिरनावळ यांनी सहभाग नोंदवला.
निवड चाचणी दरम्यान उत्कृष्ट खेळ करत कु समृद्धी बनकर कु वेदिका वाघमोरे कु मृण्मयी घोरपडे व कु गौरी हिरनावळ यांनी उत्कृष्ट खेळ करत स्पर्धा पूर्व प्रशिक्षण शिबिरामध्ये स्वतः स्थान प्राप्त केले.

महाराष्ट्राच्या महिलांसंघाची अंतिम निवड करण्यात आली. त्यामध्ये दी हॉकी साताराच्या कु गौरी हिरनावळ, कु मृण्मयी घोरपडे व कु वेदिका वाघमोरे या तीन महिला खेळाडूंनी उत्कृष्ट खेळ केल्याने त्याची निवड महाराष्ट्राच्या हॉकी संघात करण्यात आली.
द हॉकी सातारा संघटनेच्या व मुधोजी हायस्कूल प्रशालेच्या असलेल्या या महिला हॉकी खेळाडूंनी महाराष्ट्राच्या संघामध्ये स्थान मिळवून सातारा जिल्ह्याला बहुमान मिळवून दिला.सदर महिला हॉकी खेळाडू मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थिनी आहेत. सदर स्पर्धा रांची झारखंड येथे दि.3 ते 12 एप्रिल २०२६ या कालावधीत हॉकी इंडिया अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या आहेत.

सातारा जिल्ह्यातील फलटण येथील तीन महिला हॉकी खेळाडूंना महाराष्ट्राच्या हॉकी संघामध्ये स्थान प्राप्त केल्याने सातारा जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्रामध्ये आणखी एक मानचा तुरा रोवला गेला आहे.
या सर्व खेळाडूंना दि हॉकी सातारा संघटनेचे सचिव तथा महाराष्ट्राच्या संघाचे ज्येष्ठ हॉकी प्रशिक्षक श्री महेश खुटाळे व एन आय एस हॉकी प्रशिक्षक श्री सचिन धुमाळ प्रशिक्षण देत आहेत.
तसेच प्रशिक्षणामध्ये सहाय्यक म्हणून श्री बी बी खुरंगे, सहाय्य करत आहेत.

ही सर्व निवड प्रक्रिया हॉकी महाराष्ट्र संघटनेचे वरिष्ठ उपाध्यक्ष मा श्री मनोज भोरे ओलंपियन मा विक्रम पिल्ले , श्री सागर ठाकूर यांच्या मार्गदर्शनात खाली घेण्यात आली. त्यांनी निवड झालेल्या सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले.

सर्व प्रशिक्षक व खेळाडूंचे विधान परिषदेचे माजी सभापती तथा विधान परिषदेचे विद्यमान आमदार मा श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन मा.श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर ,सातारा जिल्हा परिषदे चे माजी अध्यक्ष तथा फलटण एज्यूकेशन सोसायटी चे सेक्रेटरी मा.श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटण एज्युकेशन सोसायटीच्या क्रीडा समिती चेअरमन श्री शिवाजीराव घोरपडे, मुधोजी हायस्कूलचे प्राचार्य श्री वसंतराव शेडगे व दि हॉकी सातारा संघटनेचे अध्यक्ष श्री बाहुबली शहा, व इतर पदाधिकारी श्री पंकज पवार ,श्री प्रवीण गाडे, श्री विजय मोहिते,श्री महेंद्र जाधव ,श्री सचिन लाळगे व माजी राष्ट्रीय खेळाडू श्री सुजीत निंबाळकर यांनी अभिनंदन केले.


