
उद्या होणाऱ्या उपसभापती पदग्रहण समारंभासाठी शिवसेनेकडून जय्यत तयारी
फलटण टुडे वृत्तसेवा ( फलटण, दि १ एप्रिल २०२६): – फलटण पंचायत समितीच्या उपसभापतीपदी अमोल दशरथ सस्ते यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर त्यांच्या पदग्रहण सोहळ्याचे आयोजन गुरुवार, दिनांक ०२ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १०:३० वाजता पंचायत समिती, फलटण येथे करण्यात आले आहे.

या सोहळ्यासाठी शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत हा पदग्रहण सोहळा उत्साहात पार पडणार असून उद्या होणाऱ्या फलटण पंचायतिच्या उपसभापती पदग्रहण कार्यक्रमाला महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती तथा विधान परिषदेचे विद्यमान सदस्य आमदार मा श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, शिवसेनेचे सातारा जिल्हा संपर्कप्रमुख शरदराव कणसे, कराडचे नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव, माजी आमदार दिपकराव चव्हाण, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रघुनाथराजे नाईक निंबाळकर, नगरसेवक श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर तसेच फलटण पंचायत समितीचे माजी सभापती श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर हे प्रमुख उपस्थित राहणार आहेत.

याशिवाय जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव, जिल्हा समन्वयक विराज खराडे, उपजिल्हाप्रमुख अविनाश फडतरे, तालुका संघटक विजयराव मायने, तालुकाप्रमुख नानासाहेब इवरे, ज्ञानेश्वर पवार, हेमंत सुतार, शहर प्रमुख निलेश तेलखडे, युवा सेना जिल्हा प्रमुख सचिन चव्हाण, जिल्हा समन्वयक अमित पवार, जिल्हा उपाध्यक्ष आकाश रिटे तसेच तालुकाध्यक्ष सुभाष पवार यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

या पदग्रहण सोहळ्याच्या निमित्ताने फलटण तालुक्यातील विकासकामे, संघटनात्मक बळकटी आणि आगामी राजकीय वाटचालीवर चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कार्यक्रमासाठी कार्यकर्त्यांकडून जोरदार तयारी सुरू असून परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
अमोल सस्ते यांच्या नेतृत्वाखाली पंचायत समितीच्या कामकाजाला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात असून, हा सोहळा फलटणच्या राजकीय दृष्टीने महत्त्वाचा ठरणार आहे.


