रुई मध्ये साधेपणाने यात्रा संपन्न होणार

रुई येथील भैरवनाथ देवाची मूर्ती

फलटण टुडे वृत्तसेवा (बारामती दि.७ एप्रिल २०२६):-
तत्कालीन उपमुख्यमंत्री स्व: अजितदादा पवार यांच्या दुःखद निधनामुळे रुई येथील भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट यांच्या वतीने भैरवनाथ यात्रा उत्सव २०२६ साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Screenshot


करमणूक कार्यक्रम न घेता देवाचे धार्मिक कार्यक्रम साधेपणाने साजरे करण्यात येणार आहेत.
गुरुवार दि ९ एप्रिल रोजी सायंकाळी सात वाजता भैरवनाथ,देवाचा हळदी चा कार्यक्रम ,
शुक्रवार दि.१० एप्रिल रोजी सकाळी आठ वाजता काठी पालखी मिरवणूक दंडवत, नैवेद्य व घोटा कार्यक्रम सांयकाळी ७ वाजता लग्न सोहळा व रात्री ८ नंतर छबिना काठी पालखी भव्य मिरवणूक रुई गावातून काढली जाणार असल्याचे भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट रुई चे संस्थापक अध्यक्ष महादेवराव पांडुरंग चौधर व खजिनदार पोपट गणपत साळुंके सदस्य रत्नदीप कांबळे, नवनाथ भागवत चौधर यांनी सांगितले.

Screenshot


तरी धार्मिक कार्यक्रम साठी सर्वांनी उपस्तीत राहण्याचे आवाहन ट्रस्ट च्या वतीने करण्यात आले आहे.


Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!