राज्य परिवहन महामंडळाकडून उन्हाळी गर्दीच्या हंगामासाठी 10 टक्के भाडेवाढ आकारणी

फलटण टुडे वृत्तसेवा (सातारा दि.१३ एप्रिल २०२६):-महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातर्फे उन्हाळी गर्दीचा हंगाम दि. 15 एप्रिल ते 15 जून 2026 या कालावधीत परीवर्तनशील भाडे आकारणी प्रवास भाडे दरामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला असून यानुसार साध्या, जलद, रात्रसेवा साधारण बसेससाठी 10 टक्के दराने भाडेवाढ करण्यात आली आहे. तसेच प्रतिप्रवाशी 2 रुपयांची स्वच्छता अधिभारही वाढविण्यात आला असल्याची माहिती राज्य परिवहनाच्या सातारा विभाग नियंत्रकानी दिली आहे.
ज्या प्रवाशांनी सदर कालावधीसाठी आगावू आरक्षण केलेले असेल त्यांचेकडून प्रवास करतेवेळी आरक्षण तिकीटाचा जुना दर व नवीन तिकीट दर यातील फरक तिकीट वसूल करण्यात येणार आहे.
000

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!