डॉ.होमी भाभा राज्य विद्यापीठ मुंबई च्या कला शाखेच्या (द्वितीय वर्ष ) अभ्यासक्रमासाठी फलटण येथील तरुण लेखक,साहित्यिक, चरित्र अभ्यासक अमर शेंडे यांनी लिहिलेल्या व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ,मुंबई यांनी प्रकाशित केलेल्या मुंबईचे शिल्पकार नामदार जगन्नाथ तथा नाना शंकरशेट यांच्या चरित्राची निवड झाली असल्याची माहिती विद्यापीठाच्या अधिष्ठाता डॉ. सौमित्रा सावंत यांनी दिली आहे.

फलटण – डॉ.होमी भाभा राज्य विद्यापीठ मुंबई च्या कला शाखेच्या (द्वितीय वर्ष ) अभ्यासक्रमासाठी फलटण येथील तरुण लेखक,साहित्यिक, चरित्र अभ्यासक अमर शेंडे यांनी लिहिलेल्या व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ,मुंबई यांनी प्रकाशित केलेल्या मुंबईचे शिल्पकार नामदार जगन्नाथ तथा नाना शंकरशेट यांच्या चरित्राची निवड झाली असल्याची माहिती विद्यापीठाच्या अधिष्ठाता डॉ. सौमित्रा सावंत यांनी दिली आहे.

डॉक्टर होमी भाभा राज्य विद्यापीठ हे मुंबईतील शंभर वर्षापेक्षा जास्त इतिहास असणाऱ्या व पूर्वी मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या एल्फिन्स्टन कॉलेज, सिडनहॅम कॉलेज,सेकंडरी ट्रेनिंग कॉलेज आणि द इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स,या महाविद्यालयांचे एकत्रित सार्वजनिक संशोधन विद्यापीठ असून या विद्यापीठाची स्थापना सन २०१९ मध्ये करण्यात आलेली आहे. मुंबईच्या शैक्षणिक,सामाजिक, सांस्कृतीक, जडणघडणीमध्ये या ऐतिहासिक वारसा असणाऱ्या या महाविद्यालयांचे योगदान मोलाचे आहे.या महाविद्यालयामधून मुंबईच्या शिल्पकाराचे अर्थात नाना शंकरशेट यांचे चरित्र विद्यार्थ्यांना अभ्यासता येणार आहे.

अमर शेंडे हे महाराष्ट्र साहित्य परिषद शाखेचे कार्यवाह असून गेली वीस वर्षे साहित्य क्षेत्रात कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांच्या यशवंतराव चव्हाण विचारधन एक सुवर्ण ठेवा या पुस्तकाची हैदराबाद येथील राजा राममोहन रॉय ग्रंथालय,कलकत्ता व महाराष्ट्र शासनाच्या ग्रंथ भेट योजनेसाठी निवड झाली होती.तसेच मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या वरील त्यांच्या बाळशास्त्री या चरित्रा ची दखल यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई यांनी घेतलेली आहे.तसेच अमर शेंडे यांच्या साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल पुणे येथील प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती समितीच्या वतीने प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती सन्मानाने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.

त्यांच्या या चरित्र ग्रंथाच्या निवडीबद्दल विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजनीश कामत, कुलसचिव विलास पाध्ये, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष सदानंद मोरे, सदस्य रवींद्र बेडकीहाळ,सचिव डॉ मीनाक्षीताई पाटील, राजकीय विश्लेषक जेष्ठ पत्रकार योगेश त्रिवेदी, एल्फिन्स्टन महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.सौमित्रा सावंत,विज्ञान संस्थेचे संचालक डॉ. श्रीनिवास कुलकर्णी, सिडनहॅम महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. श्रीनिवास धुरे, शासकीय अध्यापक महाविद्यालयाच्या प्राचार्य प्रा.सुविधा सरवणकर, न्यायसहाय्यक विज्ञान संस्थेच्या संचालक प्रा. वंदना कांबळे, दैवज्ञ समाजोन्नती परिषदेचे अध्यक्ष डॉ. गजानन रत्नपारखी, नाना शंकरशेट प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेंद्र शंकरशेट, सरचिटणीस अॅड. मनमोहन चोणकर व दैसपचे सरचिटणीस चंद्रशेखर दाभोळकर, एल्फिन्स्टनचे प्रा.बाळासाहेब खोमणे, साहित्य मंडळाचे प्रपाठक रामेश्वर रोकडे यांनी अमर शेंडे यांचे विशेष अभिनंदन केले आहे.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!