हर घर तिरंगा घर घर तिरंगा उपक्रम विविध कार्यक्रमांचे आयोजन करुन यशस्वी करावा-पालकमंत्री शंभूराज देसाई

सातारा दि. 9 – हर घर तिरंगा घर घर तिरंगा उपक्रमांतर्गत सातारा जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करुन हा उपक्रम जिल्ह्यात यशस्वी करावा. तसेच प्रशासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांमध्ये नागरिकांचाही सहभाग घ्यावा, असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात हर घर तिरंगा म्हणजेच हर घर तिरंगा उपक्रमासंदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीला अपर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमळे, महिला व बाल विकास अधिकारी विजय तावरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रोहिणी ढवळे यांच्यासह सर्व प्रांताधिकारी, तहसीलदार व गट विकास अधिकारी उपस्थित होत.
हर घर तिरंगा घर घर तिरंगा उपक्रमांतर्गत सातारा शहरात मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करावे, अशा सूचना करुन पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, या उपक्रमांतर्गत शासकीय कार्यालये व जिल्ह्यातील धरणांवर विद्युत रोषणाई करावी. प्रशासनाने सेल्फी पॉईंट, बचत गट यांचा तिरंगा मेलाचे आयोजन करावे. अशा सूचनाही त्यांनी केल्या.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!