फलटण टुडे वृत्तसेवा (फलटण दि १४ ) :-
फलटण एज्युकेशन सोसायटीच्या मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटण येथे रक्षाबंधनाचे औचित्य साधून दिनांक 13 ऑगस्ट रोजी “एक राखी जवानांसाठी ” हा उपक्रम राबविण्यात आला.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माजी सैनिक तसेच कर्तव्यावर रुजू असलेले पण सध्या सुट्टी निमित्त गावी आलेले सैनिक बांधव यांना विद्यालयाने पत्राद्वारे निमंत्रण देऊन रक्षाबंधनाच्या कार्यक्रमासाठी बोलवले होते या कार्यक्रमास पंचवीस आजी-माजी सैनिकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली .
सर्वप्रथम स्वागतगीताद्वारे पाहूण्यांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. वनीता लोणकर यांनी केले. तर उपप्राचार्य श्री. नितीन जगताप यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला व सर्व मान्यवरांचे स्वागत पुष्प देवून मा. प्राचार्य श्री सुधिर अहिवळे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
संपूर्ण देशाचे रक्षण हे सीमेवर लढणारे सैनिकांच्या मनगटाच्या आधारित हस्ते या सैनिकांच्या देश निष्ठेमुळेच देशातील प्रत्येक नागरिका मुक्तपणे श्वास घेत असतो सैनिकांच्या या देशप्रेमासाठी एक कृतज्ञतेची भावना म्हणून त्यांना रक्षाबंधनाच्या निमित्ताने विद्यालयात बोलून त्यांचे औक्षण करून राखी हातावर बांधणे व सीमेवरील सैनिक बांधवांना सणानिमित्त राख्या पाठवणे व त्यांच्या प्रति आदर भावना व्यक्त करणे यासारखा स्तुत्य उपक्रम सर्व विद्यालयात साजरा केला गेला पाहिजे असे मत प्राचार्य मा. श्री सुधीर अहिवळे यांनी या प्रसंगी व्यक्त केले .
याप्रसंगी प्रशालेचे माजी विदयार्थी श्री. जे. एस. काकडे यांनी इंडिअन एअरफोर्स मध्ये असणारे नियम, शिस्त व अनुभवलेले प्रसंग यांचे वर्णन अत्यंत उत्तमपणे मांडले. तसेच, प्रशालेतील विदयार्थ्यांनी तयार केलेल्या राख्या सर्व विद्यार्थीनींनी औक्षण करून प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित असलेल्या देशाच्या जवानांना बांधल्या
तसेच यावेळी रक्षाबंधन साजरा करण्यामागील कथा कु. शिंदे टी. व्ही. यांनी सांगितली तर श्री. रणवरे सर यांनीही जवानांचे कार्य स्पष्ट केले याप्रसंगी अक्षय खलाटे याने लिहिलेल्या पत्राचे सर्वांसमोर
वाचन करण्यात आले .
याप्रसंगी हवालदार श्री सदाशिव केंजळे, नाईक सुभेदार श्री दिलीप भिसे, श्री. संदेश गरूड, श्री हनुमंत हास्पे, श्री. स्वप्निल बर्गे, व वॉरंट ऑफिसर इंडियय (एअरफोर्स चे श्री. जे. एस. काकडे. (माजी विद्यार्थी), नाईक कैलास ठणके, शिपाई अनिल पखाले नाईक सुभेदार श्री. दिलीप मिसे, हवालदार पवार इत्यादी प्रमुख अतिथी उपस्थित होते.
“एक राखी सैनिकांसाठी ” हा सहशालेय उपक्रमा प्रसंगी प्रशालेचे प्राचार्य श्री. सुधिर अहिवळे , उपप्राचार्य श्री. नितीन जगताप , प्रशालेचे कलाशिक्षक बापूराव सूर्यवंशी , घाटगे सर ,सतीश नाळे, कु. तृप्ती शिंदे, अमोल सपाटे , शंकर तडवी , अमोल नाळे, संतोष तोडकर, दत्तात्रेय मुळीक ,विकास रोमन , दत्तात्रय मोहिते,राजाभाऊ गोडसे ,अनिल यादव,चैतन्य बोबडे,सौ लतिका अनपट, सौ सोहनी सस्ते , रसाळ मॅडम , आगवणे मॅडम,थोरात मॅडम,घोलप मॅडम, सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.
कार्यक्रमाचे नियोजन चित्रकला विभागाचे प्रमुख श्री. बापूराव सुर्यवंशी व श्री. घाटगे , सतिष नाळे , प्रशालेचे एन सी सी विभाग प्रमुख श्री पवार सर व त्यांचे एन सी सी कॅडेट यांनी केले. सूत्रसंचलन कु. तृप्ती शिंदे यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री. अमोल रणवरे यांनी केले.