एसटी मध्ये ७६ वर्षानंतरही कामगारांना शिस्त व आवेदन कार्यपद्धतीचे प्रशिक्षण घ्यावे लागते हे प्रशासन व चळवळीतील पुढारी या दोघांचेही अपयश

          एस टी कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण संपन्न 

    उपस्थित एसटी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना                                      मान्यवर

फलटण टुडे वृत्तसेवा (बारामती ): –
 (मंगळवार  २ जुलै)
एसटीला जून मध्ये ७६ वर्षे पूर्ण झाली.एवढ्या वर्षानंतर सुद्धा चळवळीतील प्रस्तापित पुढारी व प्रशासन या दोघांनाही कर्मचाऱ्यांना शिस्त व आवेदन कार्यपद्धतीचे प्रशिक्षण द्यावे असे वाटले नाही. हेच या चळवळीचे दुर्दैव व अपयश असल्याची खंत महाराष्ट्र एस.टी. कर्मचारी काँग्रेसचे अध्यक्ष आमदार भाई जगताप यांनी व्यक्त केली.
 एसटी कामगारांच्या प्रशिक्षण शिबिरात ते बोलत होते. या शिबिराला राज्य भरातील एसटी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रसंगी कामगारांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले की,एसटीला ७६ वर्षे पूर्ण झाली असल्याचे आपण अभिमानाने सांगतो. पण ज्या कर्मचाऱ्यांमुळे एसटीची भरभराट झाली.त्यांना ७६ वर्षानंतर सुद्धा शासकीय कर्मचाऱ्यां प्रमाणे वेतन मिळत नाही. त्यांना वेळेवर महागाई भत्ता मिळत नाही. त्याच बरोबरच त्यांना नोकरी करताना सुरक्षित नोकरी कशी करावी. याची माहिती दिली जात नाही.तसेच कामगारांसाठी कोण कोणती परिपत्रके आहेत. याचीही माहिती दिली जात नाही.हे चळवळीचे अपयश असून प्रस्तापित पुढारी व प्रशासन हे दोघेही याला जबाबदार असून वेतन वाढीच्या मागणीसाठी टॉवरवर चढून जीव धोक्यात घालण्यापेक्षा  अपयशी पुढाऱ्यांना जाब विचारला पाहिजे असे स्पष्ट मतही त्यांनी व्यक्त केले.
युती सरकारवर टीका करताना ते म्हणाले की, महविकास आघाडीचे सरकार असताना आझाद मैदानात काही पुढाऱ्यांनी ठिय्या मांडला होता. एसटीचे शासनात विलीनीकरण झाले पाहिजे. शासकीय कर्मचाऱ्यां प्रमाणे वेतन मिळाले पाहिजे. या मागण्या त्या वेळी करण्यात आल्या. मग आता विलीनीकरण झाले पाहिजे अशी मागणी का केली जात नाही? विलीनीकरण झाल्या शिवाय प्रश्न कायम स्वरुपी मिटणार नाहीत. त्या मुळे कुठल्याही नियमात बसावा. पण विलीनीकरण झालेच पाहिजे असेही त्यांनी यावेळी सांगितले.
या वेळी “खेळ मांडियेला नवा” या एसटी कामगारांच्या जीवनावर आधारित कथेचे लेखक काशिनाथ माटल, तसेच संजीव चिकुर्डेकर यांचा सत्कार करण्यात आला.
संघटनेचे सरचिटणीस श्रीरंग बरगे, पदाधिकारी सर्वश्री अभय साळुंके,शेखर कोठावळे, विजय बोरगमवार,दिनेश धुमाळे, संतोष गायकवाड,वसंत बोराडे,विजय चंदनकर, चंदन राठोड, फैयाज पठाण, जयंत मुळे, शंकर पाटकर, दीपक जगदाळे, बालाजी ढेपे, विनोद दातार,मनीष बत्तुलवार, मनीषा कालेस्वर,श्रीकांत आढाव,सुगंधा हीले, सुमन ढेंबरे, संदीप गोसावी, प्रमोद गुंडतवार, प्रवीण चरपे, आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!