फलटण टुडे वृत्तसेवा( फलटण) दि.२६ : –

फलटण तालुका ॲथलेटिक्स असोसिएशन, फलटणच्या वतीने मुधोजी महाविद्यालय क्रीडांगण फलटण येथे, शनिवार दि. २९ जून २०२४ व रविवार दि. ३० जून २०२४ फलटण तालुकास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धा २०२४ आयोजित करण्यात आल्या असून, या मैदानी स्पर्धेत ८ वर्षे,१० वर्षे, १२ वर्षे, १४ वर्ष, १६ वर्ष व १८ वर्ष वयोगटातील फलटण तालुक्यातील मुला मुलींना सहभागी घेता येईल, तरी जास्तीत जास्त स्पर्धकांनी फलटण तालुकास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेत सहभाग घ्यावा असे आवाहन फलटण तालुका ॲथलेटिक्स असोसिएशन कडून
करण्यात आले आहे.
फलटण तालुका स्तरीय मैदानी स्पर्धेचा शुभारंभ दिनांक २९ जून २०२४ रोजी सकाळी १० वाजता मान्यवरांच्या शुभहस्ते मुधोजी महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर होणार आहे. दिनांक २९ जून रोजी १८ वर्षे, १६ वर्षे व १४ वर्षे वयोगटातील मुला मुलींच्या व दिनांक ३० जून रोजी १२ वर्षे, १० वर्षे व ८ वर्षे वयोगटातील मुला मुलींच्या स्पर्धा होणार आहेत.
वयोगट १८ वर्ष आतील मुले मुली यांना १०० मीटर धावणे, ४०० मीटर धावणे, १६०० मीटर धावणे व गोळा फेक या क्रीडा प्रकारात सहभागी होता येईल. वयोगट १६ वर्ष आतील मुले मुली यांना १०० मीटर धावणे, ४०० मीटर धावणे, ८०० मीटर धावणे व गोळा फेक या क्रीडा प्रकारात सहभागी होता येईल. वयोगट १४ वर्ष आतील मुले मुली यांना १०० मीटर धावणे ४०० मीटर धावणे ६०० मीटर धावणे व गोळा फेक या क्रीडा प्रकारात सहभागी होता येईल. 
वयोगट १२ वर्ष आतील मुले मुली यांना १०० मीटर धावणे, २०० मीटर धावणे, ३०० मीटर धावणे या क्रीडा प्रकारात सहभागी होता येईल. वयोगट १० वर्ष आतील मुले मुली यांना ५० मीटर धावणे, ८० मीटर धावणे, १०० मीटर धावणे या क्रीडा प्रकारात सहभागी होता येईल. वयोगट ८ वर्ष आतील मुले मुली यांना ३० मीटर धावणे, ६० मीटर धावणे या क्रीडा प्रकारात सहभागी होता येईल. 
स्पर्धकांनी नाव नोंदणीसह प्रवेश फी ५० रुपये जमा करून आपले चेस नंबर दि. २४ जून २०२४ ते २७ जून २०२४ या कालावधीत सकाळी ७ वा. ते दु. १२ वा. या वेळेत जिमखाना विभाग, मुधोजी महाविद्यालय, फलटण येथून घेऊन जावेत. प्रत्येक खेळाडूस २ क्रीडा प्रकारात सहभाग नोंदवता येईल.
स्पर्धकांनी अधिक माहितीसाठी श्री. जनार्दन पवार 9284765995, श्री. नामदेव मोरे 9960082120, अॅड. रोहित अहिवळे 9960885007, श्री. राज जाधव 9226139653, प्रा. तायाप्पा शेंडगे 9322848199, श्री. धिरज कचरे 8390991999, श्री. सुहास कदम 7083720520, श्री. सुरज ढेंबरे 8805777998 यांच्याशी संपर्क साधावा.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!