ह.भ.प.कै बबन महाराज घाडगे यांच्या स्मृती पित्यर्थ वृषारोपन
फलटण टुडे वृत्तसेवा (बारामती ) :-
वाढते नागरीकरण, जमिनीतील पाण्याचे प्रमाण कमी होत असताना, निसर्गाचा असमतोल होऊ नये व पुढील पिढीला स्वच्छ आरोग्य व पर्यावरण मिळावे या साठी वृषारोपन करणे हे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे आणि वृषारोपन ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन पुणे जिल्हा राष्ट्रवादी चे सरचिटणीस प्रा. अजिनाथ चौधर यांनी केले.
रुई येथील ह.भ.प.कै बबन महाराज घाडगे यांच्या स्मृती पित्यर्थ मंगळवार दि.२५ जून रोजी रुई मधील सेव्हन ग्रीन, दशरथ नगर, उपाध्ये नगर येथील परिसरात १०१ मोहगणी रोपट्याचे वृषारोपन करण्यात आले.
या प्रसंगी प्रा. अजिनाथ चौधर यांनी उपस्तीत नागरिकांना मार्गदर्शन केले.
या वेळी जयसिंग अण्णा चौधर, शिवनाथ रावळ ,धनंजय ठोके, सुभाष सातव, राजेंद्र साळुंखे, निकाल चौधर, सचिन राऊत, मेजर राजीव सस्ते, मंथन कांबळे, रवींद्र निकम, मनोज आटोळे ,नंदकुमार रणदिवे, दीपक गायकवाड, रामेश्वर संघवी, सचिन ओव्हाळ, श्रीधर वाबळे, विशाल गोडसे, आप्पा चौधर आदी मान्यवर व नागरिक उपस्तीत होते.
रुई परिसरात “मागेल त्यास वृक्ष” या संकल्पनेनुसार रस्त्याच्या कडेला, सोसायटी समोर,घरांच्या बाजूला, ओपन स्पेस मध्ये वृक्षरोपण करण्यात येणार असून वृक्षारोपण झाल्यानंतर ट्रिगार्ड लावून, खत पुरवठा आणि पाणी पुरवठा मोफत केले जाणार आहे व वृक्ष चे रूपांतर झाडांमध्ये होईपर्यंत काळजी घेतली जाणार असून रुई परिसर पर्यावरण पूरक व प्लास्टिक मुक्त करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे प्रा अजिनाथ चौधर यांनी सांगितले.
आभार मंथन कांबळे यांनी मानले.
*सत्कार व ग्वाही*
प्रा अजिनाथ चौधर यांनी स्वखर्चाने खड्डे घेणे, विविध रोपटे विकत आणणे व नागरिकांच्या मदतीने वृषारोपन करणे आदी उपक्रम मोफत करत असल्याबद्दल सेवन ग्रीन, दशरथ नगर, उपाध्ये नगर मधील नागरिकांनी सत्कार केला व रोपट्याचे मोठ्या वृषात रूपांतर होई पर्यंत साथ देण्याची ग्वाही दिली.
————————-