आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योग प्रात्यक्षिक सादर करताना योगाचार्य संदीप टिळेकर प्राचार्य पी एच कदम प्राध्यापक स्वप्निल पाटील, प्राध्यापक तायप्पा शेंडगे व इतर मान्यवर
फलटण टुडे वृत्तसेवा (फलटण) :-
मुधोजी महाविद्यालय,फलटण येथे शारीरिक शिक्षण व क्रीडा विभाग,राष्ट्रीय छत्र सेना विभाग,राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या वतीने आंतरराष्ट्रीय योगा दिन साजरा करण्यात आला
या कार्यक्रमाची प्रमुख अतिथी व मार्गदर्शक योगाचार्य श्री. संदीप टिळेकर हे उपस्थित होते त्यांनी योगासन प्रात्यक्षिक सुंदररित्या करून दाखवले व सर्वांकडून करून घेतले
या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.एच.कदम सर यांनी योगाचे महत्व पटवून दिले
या कार्यक्रमास क्रीडा विभागातील खेळाडू,राष्ट्रीय छात्र सेनेचे छात्र,राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक उपस्थित होते तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक,शिक्षकेतर कर्मचारी व सेवक वर्ग उपस्थित होते.
या कार्यक्रमाची प्रस्ताविक क्रीडा विभाग प्रमुख प्रा.डॉ.स्वप्नील पाटील यांनी केली तर आभार प्रा. तयाप्पा शेडगे मानले .