फलटण टुडे वृत्तसेवा (बारामती ) :-
गोजुबावीच्या विविध कार्यकारी विकास सोसायटीच्या चेअरमन पदी पांडुरंग मारुती जाधव यांची बिनविरोध निवड झाली. या अगोदर चेअरमन पदी असलेल्या दिलीप आटोळे यांनी राजीनामा दिल्याने हे पद रिक्त होते.मंगळवार २५ जून रोजी त्यांचा या पदासाठी एकमेव अर्ज आल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली.या प्रसंगी सोसायटीचे संचालक विकास आटोळे,सोनल आटोळे,दिलीप आटोळे,भारत गावडे,सचिव देविदास भापकर उपस्थित होते.ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी तानाजी आटोळे,कल्याण आटोळे,गोपाळ जाधव,सुनील जाधव,तानाजी जाधव,राजेंद्र जाधव,संजय बगाडे,तुषार गटकळ,प्रमोद आटोळे,भारत गावडे,मोहन आटोळे यांनी प्रयत्न केले.
यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून मिलिंद टांकसाळे यांनी काम पाहिले