फलटण टुडे वृत्तसेवा (बारामती ): –
वैद्यकीय प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या नीट परीक्षेत बांदलवाडी ता.बारामती या परिसरात राहणाऱ्या चि. स्वप्नील सुनील कुदळे या चित्रकथी समाजाच्या विद्यार्थ्याने घवघवीत यश संपादन केलं आहे. स्वप्नील याने नीट परीक्षेत ७२० पैकी ५१२ असे गुण मिळवले आहेत. घरची अतिशय प्रतिकूल परिस्थिती असताना व कोणतेही शैक्षणिक पार्श्वभूमी नसताना देखील स्वप्नील ने हे यश मिळवले आहे. गणेश कुदळे , शरद कुदळे, धनंजय जमदाडे व बांदल वाडी ग्रामस्थांनी त्याचा सन्मान करून यांनी त्याचे अभिनंदन केले.
आई वडिलांचे स्वप्न डॉक्टर होण्याचे पूर्ण करू व डॉक्टर झाल्यावर रुग्ण सेवा हीच ईशवर सेवा समजून कार्य करू असे सत्कारास उत्तर देताना स्वप्नील कुदळे यांनी सांगितले.