फलटण टुडे वृत्तसेवा (बारामती ): –
बारामती येथील श्रावण सखी महिला बचत गट यांच्यावतीने वटपौर्णिमा निमित्त वडाच्या झाडाचे पूजन करताना बारामती शहरातील नीरा डावा कालवा येथील परिसर व जलसंपदा विभाग कार्यालय परिसरात सर्वात जास्त वडाच्या झाडाच्या संगोपन केले व नवीन वडाच्या झाडाचे वृषारोपन केले परिसरात जास्तीतजास्त स्वच्छ ऑक्सिजन पातळी राहावी ,पर्यावरण उत्कृष्ट राहावे या साठी जाणीवपूर्वक प्रत्यन केल्याबद्दल जलसंपदा विभागाचे अभियंता अनिल जाधव व सहकारी यांचा सन्मान करण्यात आला.
या प्रसंगी श्रावणी सखी महिला बचत गटाच्या ज्योती जाधव व सौ ज्योती जाधव , सौ रेखा तानवडे, सौ सोनाली खांडेकर, सौ स्नेहा उंडाळे, सौ कल्पना माने , सौ रेखा जाधव, सौ वैष्णवी आडाने , सौ आरती आडाने आदी महिला सदस्या उपस्तीत होत्या.
वृक्षारोपण करणे ही काळाची गरज आहे परंतु असलेले सर्व वृक्ष , आयर्वेद वनस्पती यांची उत्कृष्ट निगा ठेवणे व त्यांचे आयुष्यमान वाढण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणाऱ्या संस्था ,व्यक्ती, सार्वजनिक मंडळ यांचा आत्मविश्वास वाढावा व त्यांचे हातून अनेक वेळा पर्यावरणाच्या संदर्भात उत्तम काम व्हावे यासाठी श्रावण महिला बचत गट च्या वतीने दरवर्षी वट पौर्णिमा निमित्त सत्कार करण्यात येत असल्याचे श्रावण सखी महिला बचत गटाच्या ज्योती जाधव यांनी सांगितले