जीएसटी संबंधित समस्या कळवण्याचे आवाह – धनंजय जामदार

धनंजय जामदार

फलटण टुडे वृत्तसेवा (बारामती ): –
वस्तू व सेवाकर विभागाच्या पुणे विभागांतर्गत ग्रीव्हन्स रेडरेसल कमिटीची (Grievance Redressal Committee Pune Zone) दहावी बैठक २५ जून २०२४ रोजी पुण्यात आयोजित करण्यात आलेली असून बारामती परिसरातील उद्योग व्यावसायिक करदात्यांनी त्यांना जीएसटी विषयी भेडसावणाऱ्या समस्या अथवा सूचना असल्यास कळवाव्यात जेणेकरून जीएसटी बैठकीमध्ये त्या मांडून वरिष्ठ पातळीवरून त्या सोडवण्याचा प्रयत्न करता येईल असे आवाहन या समितीचे सदस्य तथा बारामती इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असोसिएशनचे अध्यक्ष धनंजय जामदार यांनी केले आहे.
केंद्रीय वस्तू व सेवाकर पुणेचे मुख्य आयुक्त व राज्य वस्तू व सेवाकर विभागाचे आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली सदर समिती कार्यरत असून पुण्यासह कोल्हापूर आयुक्तालयाचे कार्यक्षेत्र या समितीच्या कार्यकक्षेत आहे. 
जीएसटी करदात्यांचे सर्व प्रश्नांचा अभ्यास करुन ते सोडवणे, प्रक्रियेतील अडथळे व सॉफ्टवेयर संबंधी विशिष्ठ अथवा सार्वत्रिक समस्यांचे निवारण, जीएसटी करदात्यांना जाचक ठरणारे कायदे, नियमअटी, परिपत्रके बाबत जीएसटी कौन्सिल सचिवालय व सेंट्रल बोर्ड ऑफ इनडायरेक्ट टॅक्सेसच्या धोरण विभागाच्या निदर्शनास आणून त्यात सुधारणा करण्यासाठी शिफारस करणे आदी महत्वाचे कामकाज ही विभागीय समिती करत असते.
२०१७ साली जीएसटी लागू केल्यापासून आजतागायत ही करप्रणाली व तिच्या अंमलबजावणी बाबत अनेक समस्या व संभ्रम असून करदात्यांना योग्य मार्गदर्शन करन त्यात सुलभता आणणे आवश्यक असलेने बारामती परिसरातील जीएसटी करदात्यांनी आपले प्रश्न व सूचना अवश्य कळवावेत, ते सोडवण्यासाठी या समितीच्या माध्यमातून सर्वोतोपरी प्रयत्न करू असे आवाहन धनंजय जामदार यांनी केले आहे.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!