बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया फलटण सेंटर व फलटण एज्युकेशन सोसायटीच्या मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने योग दिनाचे आयोजन
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त बिल्डर असोसिएशन ऑफ इंडीया फलटण सेंटर चे अध्यक्ष किरण दंडिले यांचा सत्कार करताना प्राचार्य सुधीर अहिळे , राजीव निंबाळकर ,सचिन निंबाळकर , रणसिंग सर , डॉ प्रसाद जोशी , सचिन धुमाळ इतर मान्यवर
फलटण टुडे वृत्तसेवा ( फलटण दि २१ जून ) : –
बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया फलटण सेंटर व फलटण एज्युकेशन सोसायटी फलटण च्या मुधोजी हायस्कूल व जुनिअर कॉलेज फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दिनांक 21 जून 2024 रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज मध्ये मोठ्या प्रमाणात उत्साहाने साजरा करण्यात आला.
यावेळी बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया फलटण सेंटर चे चेअरमन श्री किरण दंडिले व व्हाईस चेअरमन श्री सचिन निंबाळकर यांचे स्वागत प्रशालेचे प्राचार्य मा. श्री सुधीर अहिवळे यांनी यावेळी केले. तसेच प्रशालेचे प्राचार्य मा. श्री सुधीर अहिवळे यांचे स्वागत बिल्डर असोसिएशन चे सदस्य श्री राजीव निंबाळकर यांच्या वतीने करण्यात आले .
फलटण शहरातील नामवंत अस्थिरोग तज्ञ तथा योगा मार्गदर्शक मा. श्री डॉ. प्रसाद जोशी व मा. डॉ. सौ. प्राची जोशी व नृत्य प्रशिक्षक हर्षल कदम यांचे स्वागत प्रशालेचे प्राचार्य सुधीर अहिवळे यांनी केले .
या प्रसंगी बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया फलटण सेंटरचे सचिव स्वीकार मेहता सहसचिव आनंदराव काळोखे , गरवालीया साहेब , खजिनदार संजय डोईफोडे माजी फलटण बी बी ए आय फलटण सेंटरचे माजी अध्यक्ष श्री राजीव नाईक निंबाळकर तसेच बिल्डर असोसिएशन सदस्य सुनिल सस्ते व प्रशालेच्या ज्युनिअर कॉलेजचे उपप्राचार्य श्री देशमुख डी.एम, किमान कौशल्य विभागाचे श्री रणसिंग सर, व माध्यमिक विभागाचे पर्यवेक्षक श्री जगताप एन एम यावेळी उपस्थित होते.
यावेळी बोलताना मा. डॉ. प्रसाद जोशी यांनी सर्वांना योगासनाचे व प्राणायामाचे महत्त्व व 10 फायदे सांगितले . व योगसाधना केल्याने सर्व स्तरावरती तंदुरुस्ती मिळते वजन घटते बॉडी मास इंडेक्स साधारणतः 20 पर्यंत असावा 20 ते 30 ओवर वेट तिच्यावर गेल्यास ओबेसिटी म्हणजे स्थूलपणा मानण्यात येतो. 20 च्या आत बॉडी इंडेक्स आणायचा असेल तर योग केला पाहिजे तसेच ताणतणावातून मुक्ती मिळवण्यासाठी योगाचा फार मोठा फायदा आहे योगासन व प्राणायाम यामुळे अंतर्यामी शांतता तसेच रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत होते याचा प्रत्यय आपणास कोरोनाच्या काळात आलेला आहे ज्यांची रोग प्रतिकार शक्ती चांगली होती त्यांना कोरोनाचा त्रास कमी प्रमाणत झाला त्यामुळे योग साधना करणे गरजेचे आहे तसेच सजगते मध्ये सुद्धा वाढ होते नातेसंबंध चांगल्या पद्धतीने सुधारण्यास मदत होते आणि चांगल्या पद्धतीने आपण जीवन जगू शकतो असे यावेळी सांगितले .
यावेळी हर्षल कदम यांनी बॉडी वॉर्मपसाठी झुंबा डान्स घेतला. यानंतर मा. डॉ. प्राची जोशी यांनी योगासनाचे प्रात्यक्षिक करून दाखवले व त्या प्रमाणे सर्व विद्यार्थ्यांनी योगासनाचे व प्राणायाम प्रकार केले. यामध्ये दंड स्थितीतील आसने ताडासन, वृक्षासन, त्रिकोणासन, अर्ध चक्रासन, बैठे स्थितीतील आसन- वज्रासन वक्रासन दंडासन , पोटावर झोपून आसन – मकरासन, भुजंगासन, शलासन ,पाठीवर झोपून आसने -अर्ध हलासन,पवनमुक्तासन व शवासन
त्याचप्रमाणे सूर्यनमस्कार देखील घेण्यात आले. तसेच प्राणायाम मध्ये नाडी शोधन प्राणायाम, अनुलोम विलोम प्राणायाम व ध्यान स्थिती घेऊन आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला.
या प्रसंगी प्रशाले च्या २५० विद्यार्थ्यांनी व बिल्डर असोसिएशन ऑफ इंडियाचे 25 सदस्यांनी व प्रशालेतील सर्व शिक्षक वृंद यांनी योग साधना केली.
या कार्यक्रमाचे नियोजन मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे क्रीडा विभाग प्रमुख श्री सचिन धुमाळ सर, ज्येष्ठ क्रीडा शिक्षक श्री जाधव डी. एन., श्री खुरंगे बी.बी., एनसीसी विभाग प्रमुख श्री डी.जे पवार सर, श्री अमोल नाळे, सौ गावडे , कु. धनश्री क्षीरसागर तसेच मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज मधील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक वृंद यांनी केले.
या कार्यक्रमाच्या प्रसंगी बोलताना बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया चे राजीव निंबाळकर यांनी योग दिनासाठी मुधोजी हायस्कूलचे व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी मा. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांचे आभार मानले.
यावेळी बोलताना प्रशालेचे प्राचार्य मा. श्री सुधीर अहिवळे यांनी डॉ. श्री व सौ. जोशी यांचे आभार मानले. तसेच सलग तिसऱ्या वर्षी बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया फलटण सेंटर यांच्या वतीने मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटण येथे आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन केल्याबद्दल आभार मानले. तसेच डॉ. प्रसाद जोशी हे याच शाळेचे माजी गुणवंत विद्यार्थी व डॉक्टर असून देखील या प्रकारचे उपक्रम स्वतः घेतात याबद्दल त्यांचे आभार मानले.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार श्री बी. बी. खुरंगे यांनी मानले