वृक्षारोपण करत असताना सहली फाउंडेशनच्या सदस्या
फलटण टुडे वृत्तसेवा (बारामती ): –
शुक्रवार २१ जून रोजी वट पौर्णिमा निमित्त वृक्षारोपणाचा संदेश सर्व दूर जावा व त्याचा प्रचार आणि प्रसार व्हावा या उदेश्याने सहेली फाऊंडेशन च्या वतीने वृषारोपन करण्यात आले.
डोर्लेवाडी, झारगडवाडी जिल्हा परिषद शाळा,घोरपडे वस्ती अंगणवाडी परिसरात २५ वडाच्या झाडाचे वृषारोपन करण्यात आले.
सहली फाउंडेशनच्या वतीने गेली चार वर्षापासून वृक्षारोपण केले जात आहे. पर्यावरणाचे रक्षण व्हावे,पाणी जपून वापरावे हा संदेश देत असताना प्रत्येक झाडाला ट्री गार्ड पाण्याची सोय आणि खत सुद्धा दिले जाणार असल्याचे सहेली फाऊंडेशन संस्थापक अध्यक्षा सौ रोहिणी खरसे आटोळे यांनी सांगितले.
या प्रसंगी सहली फाउंडेशनच्या सौ.निलाखे ,सौ.शेख ,सौ.काळेबेरे,सौ.जाधव सौ.लोणकर व ग्रामस्थ ,विद्यार्थी उपस्तीत होते.