फलटण टुडे वृत्तसेवा(बारामती ): –
बारामती तालुक्यातील अंजनगाव या ठिकाणी वसुंधरा फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या वतीने वटपौर्णिमे निमित्त २१ वडांच्या झाडाचे वृक्षारोपण महिलांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी याप्रसंगी वसुंधरा फौंडेशन चे अर्जुन कदम, सोमनाथ खोमणे , अतुल कदम ,ज्योतीराम घाडगे, सोमनाथ कदम, निलेश कदम, व सौ सुशीला कदम, सौ सावित्रा कदम ,सौ पुष्पा कदम ,सौ शोभा कदम,सौ सुरेखा सावंत,सौ वर्षा कदम आदी मान्यवर उपस्थित होते.
वृक्षारोपन करून पाणी वाचवा, पाणी आडवा हा उपक्रम करीत असून सदर वृक्षांची मोठी वाढ होई पर्यंत ट्री गार्ड व खत, पाणी पुरवठा केला जाणार असल्याचे वसुंधरा फाउंडेशन अंजनगाव चे अध्यक्ष अर्जुन विजय कदम यांनी सांगितले.