पंजाब नॅशनल पावर वेटलिफ्टिंग मध्ये सानिका मालुसरे हिचे यश

सानिका मालुसरे हिला सुवर्ण पदक देताना पंजाब वेटलिफ्टिंग असोसिएशनचे पदाधिकारी

फलटण टुडे वृत्तसेवा (बारामती ): –
पंजाब राज्यात पटियाला येथे नॅशनल पावर लिफ्टिंग स्पर्धा संपन्न दि.१७ ते २१ जून दरम्यान संपन्न झाली.
या स्पर्धे मध्ये बारामती ची सानिका राजेंद्र मालुसरे हिने बेंच प्रेस प्रकारात सुवर्ण पदक मिळवले आहे .
तिचा सन्मान वेटलिफ्टिंग असोसिएशन यांच्या वतीने करण्यात आला याप्रसंगी हरिविंदर सिंग, मनोज सिंह, कुलविंद देओल ,भावसार सायकल चे अविनाश भावसार, राजेंद्र मालुसरे आदी मान्यवर उपस्तीत होते.
कुमारी सानिका मालुसरे ही शेतकरी कुटुंबातील मुलगी असून ती सध्या विद्या प्रतिष्ठान बारामती येथे एस वाय बी ए या वर्गात शिकत आहे. सध्या ती पावर लिफ्टिंग साठी पुणे येथे सोमन जिम सिंह रोड येथे सराव करते या पूर्वी विविध राज्यात व परदेशात विविध स्पर्धेत तिने यश मिळवले आहे. ऑलम्पिक स्पर्धेत देशासाठी सुवर्णपदक मिळवून देण्याच्याचे ध्येय असल्याचे सानिका मालुसरे हिने सांगितले.
उपमुख्यमंत्री अजित पवार , उपमुख्यमंत्री कार्यालयाचे कार्यालय अधीक्षक हनुमंत पाटील व बारामती सहकारी बँकेचे चेअरमन सचिन सातव,तालुका क्रीडा अधिकारी महेश चावले आदींनी अभिनंदन केले आहे.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!